शेतकऱ्यांनी हायटेक शेती करावी, पीक फवारणी करण्यासाठी ड्रोन चा वापर करावा कृषी मंत्री धनंजय मुंडे यांचे प्रतिपादन Hightech Farming

Hightech Farming
Hightech Farming


शेतकऱ्यांनी पारंपारिक शेती करण्यापेक्षा हायटेक पद्धतीने शेती करावी असे प्रतिपादन कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनामध्ये केले आहे. जाणून घेऊ या विषयी सविस्तर माहिती.

शेतकऱ्यांनी पारंपारिक शेती करण्यापेक्षा हायटेक पद्धतीने शेती करावी कृषी मंत्री धनंजय मुंडे

सध्या नागपूर येथे महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. या हिवाळी अधिवेशनामध्ये झालेल्या चर्चेदरम्यान शेतकऱ्यांनी पारंपारिक पद्धतीने शेती करण्यापेक्षा हायटेक पद्धतीने शेती करावी, पिकांच्या फवारणीसाठी ड्रोन चा वापर करावा असे प्रतिपादन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केले. 'Hightech Farming' 

Krishi Yojana Maharashtra
Krishi Yojana Maharashtra 


नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजने संदर्भात लक्षवेधी सूचना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विधान परिषदेत मांडली होती. 

यावेळी झालेल्या चर्चेदरम्यान कृषी मंत्री धनंजय मुंडे बोलत होते. पुढे बोलताना कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले की अलीकडील काळात शेती व्यवसाया मध्ये मनुष्यबळाचा अभाव निर्माण झालेला आहे. तर आजच्या यंत्र युगात शेतकऱ्यांनी अत्याधुनिक पद्धतीने शेती केल्यास शेतकऱ्यांचे कष्ट कमी होऊन कमी कालावधीत अधिकचे उत्पन्न मिळणे शक्य आहे. 

यासाठी केंद्र शासनाकडून SOP अर्थात Standard Oprating procedure (प्रमाणित कार्यपद्धती) तयार करण्यासाठी मार्गदर्शन घेण्यात येईल त्यांच्याकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर ड्रोन पायलट अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण वर्ग चालवण्यात येतील जेणेकरून शेतकऱ्यांना याचा लाभ घेता येईल. 

शेतकऱ्यांच्या मुलांनाही या ड्रोन पायलट, तसेच मेकॅनिकल अभ्यासक्रमाचा, फायदा होईल सोबतच शेतमाल विक्रीसाठी मार्केट लिंक तयार झाल्यास कृषी क्रांती होणे शक्य आहे. असे कृषिमंत्री धनंजय मुंडे यावेळी म्हणाले. 

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेअंतर्गत 362 शेतकऱ्यांनी मधुमक्षिका पालन व्यवसाय केले आहेत. या शेतकऱ्यांना पाच कोटी 23 लाखांचे अनुदान मिळाले आहे असेही कृषिमंत्री यांनी सांगितले. 

हायटेक पद्धतीने शेती केल्यास उत्पादन खर्च 25% नी कमी होईल - कृषिमंत्री धनंजय मूंडे

सध्या पारंपारिक शेती करण्यापेक्षा शेतीकडे व्यावसायिकपणे बघण्याची गरज आहे. 

बदलत्या काळात शेतकऱ्यांनी कमी श्रमात जास्त उत्पन्न घेण्याचा प्रयत्न करीत शेती करण्यासाठी अत्याधुनिक यंत्राचा वापर करण्यावर भर द्यावा. 

याचप्रमाणे पिकांच्या फवारणीसाठी ड्रोन चा वापर करावा शेतकऱ्यांनी हायटेक शेती करावी. Hightech Farming

शेतकऱ्यांनी हायटेक शेती केल्यास उत्पादन खर्च 25% ने कमी होईल असा विश्वास कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी विधान परिषदेत व्यक्त केला.

लोकशाही दिनाला कृषी अधिकारी यांनी हजर राहावे विधान परिषद उपसभापती यांची सूचना

महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात दरमहा लोकशाही दिन पाळला जातो. 

या लोकशाही दिनाच्या वेळी विविध विभागाचे अधिकारी उपस्थित असतात या दिवशी कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित राहिल्यास अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी व अडचणी सोडवता येतील अशी सूचना विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी केली.

यावर उत्तर देताना कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले की या संदर्भात जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी या सूचनेचा नक्कीच विचार करता येईल. 

तुम्हाला "Hightech Farming" ही बातमी आवडली असेल अशी आशा करतो धन्यवाद.

Post a Comment

0 Comments