बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेवर आधारित आय ॲम बन्नी हा हिंदी चित्रपट शाळा मधील विद्यार्थ्यांना दाखविण्यास राज्य शासनाची परवानगी
राज्य शासनाने दिनांक 4 डिसेंबर 2023 रोजी शासन निर्णय निर्गमित केला आहे. 'I am banni film for students'
या शासन निर्णयानुसार बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेवर आधारित आय ॲम बन्नी हा हिंदी चित्रपट राज्यातील शाळा मधील विद्यार्थ्यांना दाखविण्यास राज्य शासनाने परवानगी दिली आहे.
चित्रपटाच्या निर्मात्यांनी आय ॲम बन्नी हा हिंदी चित्रपट राज्यातील शाळांमधून दाखविण्यासाठी राज्य शासनास परवानगी मागितली होती त्यानुसार राज्य शासनाने हा चित्रपट दाखविण्यास दिनांक 4 डिसेंबर 2023 रोजीच्या जी.आर. नुसार परवानगी दिली आहे.
शासनाने शैक्षणिक वर्ष 2023 - 2024 व 2024-2025 या दोन वर्षाकरिता शाळांमध्ये चित्रपट दाखविण्यास परवानगी दिली आहे.
या चित्रपटातून समाजाला प्रेरणा व मार्गदर्शन मिळत असल्याने राज्य शासनाने दिली परवानगी
बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेवर आधारित आय ॲम बन्नी या हिंदी चित्रपटांमध्ये मुलींच्या शिक्षणावर आधारित समाजामध्ये मुलींना असलेली असमानता, सामाजिक अन्याय, व कमी विशेषाधिकार असलेल्यांच्या शिक्षणाच्या अधिकाराचे समर्थन अलौकिकरीत्या चित्रित करून दाखविलेले आहे. I am banni film for students
आत्मविश्वास से हर चुनौती पार कर सकते है हा संदेश चित्रपटात देण्याचा यशस्वी प्रयत्न करण्यात आला आहे. तसेच या चित्रपटातून समाजाला प्रेरणा व मार्गदर्शन मिळत असल्याने हा चित्रपट महाराष्ट्र राज्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांना दाखविण्यास राज्य शासनाने परवानगी दिली आहे.
शासनाने या अटीनुसार चित्रपट दाखवण्यास दिली परवानगी
1) आय ॲम बन्नी हा हिंदी चित्रपट राज्यातील शाळांमधील फक्त सहा वर्षांपुढील विद्यार्थ्यांनाच दाखविण्यास शासनाने परवानगी दिली आहे.
2) हा चित्रपट पाहण्यासाठी कोणत्याही विद्यार्थ्यांना सक्ती करता येणार नाही.
3) विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अभ्यासक्रमात कोणताही अडथळा येणार नाही याची योग्य ती दक्षता घेण्याची सूचना शासनाने दिली आहे.
4) शासनाने दिलेल्या परवानगीच्या आधारे सदर चित्रपट दाखविण्याबाबत इतर दुसऱ्या कोणत्याही संस्थेबरोबर निर्माता आर.जी. मूव्हीज मुंबई यांना करार करता येणार नाही किंवा प्रतिनिधी नेमता येणार नाही व तशी परवानगी त्यांना राहणार नाही अशी स्पष्ट सूचना शासनाने दिली आहे.
5) हा चित्रपट पाहण्यास इच्छुक विद्यार्थ्यांकडून रुपये 20 पेक्षा जास्त शुल्क चित्रपटाच्या निर्मात्यांना आकारता येणार नाही.
6) हा चित्रपट शाळांमधून दाखविताना कोणत्याही प्रकारचा वाद उद्भवल्यास किंवा तक्रारी प्राप्त झाल्यास सदर संस्थेस चित्रपट दाखविण्याची दिलेली परवानगी रद्द करण्यात येणार आहे.
7) हा चित्रपट दाखविण्याची परवानगी शैक्षणिक वर्ष 2023 - 2024 व 2024 - 2025 या वर्षापूर्तीच मर्यादित आहे.
अशा प्रकारे या तरतुदीनुसार बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेवर आधारित आय एम बन्नी हा हिंदी चित्रपट शाळा मधील विद्यार्थ्यांना दाखविण्यास राज्य शासनाने दिनांक 4 डिसेंबर 2023 रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार परवानगी दिली आहे. ''I am banni film for students"
तुम्हाला हा लेख आवडला असेल अशी आशा करतो धन्यवाद.
0 Comments