राज्य शासन अंतर्गत सरळसेवा पदभरती होणार असून 345 पदे सरळ सेवेनुसार भरली जाणार आहेत. जाणून घेऊ या विषयी सविस्तर माहिती.
महाराष्ट्र शासनाच्या या विभागामध्ये होणार सरळ सेवा पद भरती - 2023
मित्रांनो एक आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभागांमध्ये रिक्त असलेल्या एकूण 345 जागांसाठी पद भरती होणार आहे. 'Job Vacancy in Maharashtra Government'
ही सर्व पदे गट क संवर्गातील आहेत. ही सरळ सेवा पद भरती आयबीपीएस (institute of banking personal selection) मार्फत घेण्यात येणार आहे.
खालील संवर्गातील एकूण 345 पदांची भरती होणार आहे
महाराष्ट्र शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभागा मधील खालील संवर्गातील एकूण 345 रिक्त पदांसाठी सरळ सेवा पद भरती होणार आहे. Job vacancy in Maharashtra Government
उच्चस्तर लिपीक गट क या संवर्गातील एकूण 21 रिक्त पदे वित्तीय सल्लागार व उपसचिव यांचे कार्यालय अन्न नागरी पुरवठा, व ग्राहक संरक्षण विभाग मुंबई, या कार्यालयासाठी भरली जाणार आहेत.
शैक्षणिक अहर्ता वयोमर्यादा व परीक्षेचे स्वरूप
- मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवीस समतूल्य म्हणून मान्य केलेली अर्हता धारण करणे आवश्यक आहे. परंतु पुरवठा निरीक्षक पदासाठी अन्न तंत्रज्ञान किंवा अन्न विज्ञान विषयांमध्ये पदवीधारण करणाऱ्या उमेदवारांना परीक्षेत समान गुण असल्यास प्राधान्य देण्यात येईल.
- उमेदवार प्रस्तूत परीक्षे करिता अर्हता प्राप्त ठरल्यास परीक्षेच्या प्रवेशासाठी विहीत पद्धतीने आवश्यक अर्ज माहिती सादर करण्याच्या अंतिम दिनांका पर्यंत पदवी परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.
- मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
- या सरळ सेवा पद भरतीसाठी एकूण 200 गुणांची वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची परीक्षा घेतली जाणार असून परीक्षेचा कालावधी दोन तासाचा आहे.
- मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी व अंकगणित, या चार विषयावर आधारित परीक्षा घेतली जाणार आहे.
- या प्रत्येक विषयाच्या संदर्भात प्रश्नांची संख्या 25 असून एका प्रश्नासाठी दोन गुण आहेत याप्रमाणे एकूण 200 गुणांची परीक्षा घेतली जाणार आहे.
- गुणवत्ता यादीमध्ये समावेश होण्यासाठी उमेदवाराने किमान 45% गुण मिळवणे आवश्यक आहे.
- अराखीव पदासाठी वयोमर्यादा 18 ते 38 वर्षे आहे.
- तर राखीव पदासाठी वयोमर्यादा 18 ते 43 वर्षे आहे.
- अराखीव उमेदवारा करिता रुपये 1000 आहे.
- राखीव उमेदवारा करिता रुपये 900 आहे.
- माजी सैनिक उमेदवारांना परीक्षा शुल्क माफ आहे.
अर्ज सादर करण्याचा कालावधी व महत्त्वाच्या तारखा
- ऑनलाइन अर्ज सादर करण्याचा कालावधी दिनांक 13 डिसेंबर 2023 ते 31 डिसेंबर 2023 पर्यंत आहे.
- परीक्षेच्या दिनांकाच्या सात दिवस अगोदर प्रवेश पत्र ऑनलाईन उपलब्ध होतील.
मूख्यमंञी एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रारंभिक उपचार व पूनर्वसन केंद्राचे उद्घाटन संपन्न.
0 Comments