कृषी यांत्रिकीकरण योजना सन 2023 - 2024 साठी निधी लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट वितरित होणार राज्य शासनाचा निर्णय

Krishi Yantrikikaran Yojana Maharashtra
Krishi Yantrikikaran Yojana Maharashtra

Krishi Yantrikikaran Yojana Maharashtra राज्य पुरस्कृत कृषी यंत्रिकरण योजना राज्यांमध्ये राबविली जाते. 

ही योजना सन 2023 - 2024 मध्ये राबविण्यासाठी राज्य शासनाने निधी वितरित करण्याचा निर्णय घेतला असून याबाबतचा शासन निर्णय दिनांक ११ डिसेंबर 2023 रोजी प्रसिद्ध केला आहे. जाणून घेऊ या विषयी सविस्तर माहिती.

राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजना सन 2023 - 2024 साठी निधी वितरीत करण्यास राज्य शासनाची मान्यता

राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजना सन 2023 - 2024 मध्ये राबविण्यासाठी रुपये 112.1394 कोटी निधी वितरित करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला असून याबाबतचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या कृषी, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास विभागाने दिनांक 11 डिसेंबर 2023 रोजी निर्गमित केला आहे. 'Krishi Yantrikikaran Yojana Maharashtra'

कृषी यांत्रिकीकरण योजना केंद्र शासनाच्या साहाय्याने राज्यात राबविली जाते या योजने अंतर्गत शासनाच्या कृषी यांत्रिकीकरण उपाभियानातील घटक क्रमांक 3 अनुसार वैयक्तिक लाभार्थी शेतकऱ्यांना कृषी औजारे व यंत्रे खरेदीसाठी अनुदान देण्याची तरतूद आहे. तर घटक क्रमांक चार अनुसार कृषी अवजारे, यंत्र खरेदीसाठी बँकांना अनुदान देण्याची तरतूद आहे. या दोन्ही घटकांची अंमलबजावणी राज्यामध्ये केंद्र शासनाच्या कृषी यांत्रिकीकरण उप अभियानाच्या मार्गदर्शक सूचनानुसार करण्यात येते.

असा मिळतो कृषी यांत्रिकीकरण योजनेचा लाभ

कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत कृषी औजारे व यंत्रे खरेदीसाठी शेतकऱ्यांना अनुदान देण्यात येते. हे अनुदान लाभार्थी शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये थेट वितरित करण्यात येते. 

या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावा लागतो त्यानंतर महाडीबीटी पोर्टलवर कृषी यांञिकीकरण उप अभियान योजना अंतर्गत प्राप्त झालेल्या एकूण अर्जा मधून सोडतीमध्ये यशस्वी ठरलेल्या व कामे पूर्ण केलेल्या लाभार्थ्यांना सदर योजनेअंतर्गत अनुदानाचे वाटप करण्यात येते. Krishi Yantrikikaran Yojana Maharashtra

ही योजना सन 2023 - 2024 मध्ये राज्यामध्ये राबविण्यासाठी राज्य शासनाने रुपये 112.1394 कोटी निधी वितरीत करण्यास मान्यता दिली आहे. 

याबाबतचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे या शासन निर्णयानुसार महाडीबीटी पोर्टलवर प्राप्त झालेल्या अर्जांमधून सोडती द्वारे पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना अनुदानाची रक्कम थेट त्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये वितरित करण्याची सूचना महाराष्ट्र शासनाने दिली आहे.

कृषी यांत्रिकीकरण योजना ट्रॅक्टर खरेदीसाठी अनुदान

राज्य पुरस्कृत कृषि यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत ट्रॅक्टर खरेदीसाठी सूद्धा अनुदान मिळते. 

या योजनेअंतर्गत ट्रॅक्टर या बाबीसाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, महिला, अल्प, व अत्यल्प भूधारक, शेतकऱ्यांसाठी ट्रॅक्टरच्या किमतीच्या 50% किंवा रुपये 1.25 लाख यापैकी जी रक्कम कमी असेल तेवढे अनुदान लाभार्थी शेतकऱ्यांना मिळते. 

आणि इतर शेतकऱ्यांना ट्रॅक्टरच्या किमतीच्या 40% किंवा रुपये एक लाख यापैकी जे कमी असेल तेवढे अनुदान देण्यात येते.

सन 2023 - 2024 साठी कृषी यांत्रिकीकरण योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य शासनाने निधी वितरीत करण्याचा निर्णय शासन निर्णयाद्वारे घेतलेला आहे. "Krishi Yantrikikaran Yojana Maharashtra"

शासन निर्णय येथे वाचा

 तुम्हाला हा लेख आवडला असेल अशी आशा करतो धन्यवाद.

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये वाढ Rajya Shaskiya Karmachari Mahagai Bhatta Wadh

Post a Comment

0 Comments