अहमदनगर जिल्ह्यात नवीन पशुवैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे.
या बाबतचा जीआर महाराष्ट्र शासनाने दिनांक 1 डिसेंबर 2023 रोजी निगर्मित केला आहे. जाणून घेऊ या विषयी सविस्तर माहिती.
अहमदनगर जिल्ह्यात स्थापन होणार नवीन पशुवैद्यकीय महाविद्यालय
अहमदनगर जिल्ह्यात नवीन पशुवैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून या बाबतचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय, विभागाने दिनांक 1 डिसेंबर 2023 रोजी निगर्मित केला आहे. 'New veterinary college will be established'
महाराष्ट्र राज्यात पशुवैद्यक विद्याशाखेचा मोठ्या प्रमाणात विस्तार करणे गरजेचे असून पशुवैद्यक विद्याशाखेतील सध्याची विद्यार्थ्यांची संख्या दुप्पट करणे आवश्यक आहे.
सद्यस्थितीत कार्यरत असलेल्या पशुवैद्यक महाविद्यालय मधून निर्माण होणारे पशुवैद्यक मनुष्यबळ राज्यातील पशुधनाची संख्या विचारात घेता राज्यांमध्ये पशुसंवर्धन विषयक सेवा देण्याकरिता आवश्यक व्यावसायिक सेवा देणारे मनुष्यबळ अपुरे ठरत आहे.
त्यामुळे भारतीय पशुवैद्यक परिषदेच्या मानकांनुसार पशुवैद्यक महाविद्यालयाच्या विस्ताराकरिता योग्य निर्धारण व साधनसामग्रीवर गुंतवणूक करणे आवश्यक आहे.
या सर्व बाबींचा विचार करून अहमदनगर जिल्ह्यात नवीन पदवी पशुवैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे.
या विद्यापीठ अंतर्गत होणार पशुवैद्यकीय महाविद्यालयाची स्थापना
दिनांक 1 डिसेंबर 2023 रोजीच्या शासन निर्णयानुसार अहमदनगर जिल्ह्यातील मौजे सावळी विहीर खुर्द शिर्डी तालुका राहाता जि.अहमदनगर येथे 75 एकर जमिनीवर सन 2024-2025 या शैक्षणिक वर्षापासून महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर या विद्यापीठ अंतर्गत नवीन पदवी पशुवैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यास महाराष्ट्र शासनाने मान्यता दिली आहे. New veterinary college will be established
पशुवैद्यकीय महाविद्यालयासाठी एकूण 276 पदांच्या पद भरतीसाठी मंजुरी देण्यात आली आहे.
नवीन स्थापन करण्यात येणाऱ्या या पदवी पशुवैद्यकीय महाविद्यालयासाठी नियमित स्वरूपातील शिक्षक संवर्गातील 96 आणि शिक्षकेत्तर संवर्गातील 138 पदे तसेच बाह्य स्त्रोताद्वारे शिक्षकेतर संवर्गातील 42 पदे अशा एकूण 276 पदास उच्चधिकार समितीच्या मान्यतेच्या अधीन राहून राज्य शासनाने मंजुरी दिली आहे.
या पशुवैद्यकीय महाविद्यालयासाठी पुढील पाच वर्षासाठी मनुष्यबळासाठी रूपये 9748.93 लक्ष आणी कार्यालयीन खर्चासाठी रूपये 971 लक्ष अशा एकूण रूपये 1079 लक्ष एवढ्या आवर्ती खर्चास राज्य शासनाने सदरील शासन निर्णयाद्वारे मान्यता दिली आहे.
तर ही होती नवीन पदवी पशूवैद्यकीय महाविद्यालय स्थापन करणे बाबतची सविस्तर माहीती.
तूम्हाला "New veterinary college will be established" हा लेख आवडला असेल अशी आशा करतो धन्यवाद.
0 Comments