शासन आपल्या दारी कार्यक्रम परळी येथे यशस्वीपणे संपन्न Shasan Aplya Dari Programme

Shasan Aplya Dari Programme
Shasan Aplya Dari Programme 

शासन आपल्या दारी हा कार्यक्रम परळी वैद्यनाथ जिल्हा बीड येथे यशस्वीपणे पार पडला जाणून घेऊ या विषयी सविस्तर माहिती.

शासन आपल्या दारी कार्यक्रम परळी येथे यशस्वीपणे संपन्न

शासन आपल्या दारी हा महाराष्ट्र शासनाचा महत्त्वपूर्ण उपक्रम आहे शासनाच्या या महत्त्वकांशी कार्यक्रमामुळे आता राज्यातील नागरिकांना सरकारी कार्यालयामध्ये विनाकारण चकरा मारण्याची गरज राहिली नाही. 'Shasan Aplya Dari Programme' 

शासन आपल्या दारी या कार्यक्रम अंतर्गत शासकीय योजनांचा लाभ थेट लाभार्थ्यांना मिळत आहे. 

शासन आपल्या दारी या महत्त्वाच्या अभियानाचा कार्यक्रम दिनांक पाच डिसेंबर 2023 रोजी बीड जिल्ह्यातील परळी वैद्यनाथ येथे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडला. 

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या नागरिकांना संबोधित केले. 

मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले की राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यापासून नागरिकांचा सरकारी कार्यालयात हेलपाटे घालण्याचा त्रास कायमचा संपवण्यासाठी शासन आपल्या दारी कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली असून सरकारच्या या महत्त्वकांशी अभियानांतर्गत एक कोटी ऐंशी लाखाहून अधिक लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचे लाभ शासनाच्या वतीने मिळवून देण्यात आले आहेत. 

पुढे बोलताना मुख्यमंत्री यांनी सांगितले की सर्वसामान्य लोकांना न्याय देणारे हे आपले सरकार असून बीड जिल्ह्यातील शेतकरी संकटात असल्याची आम्हाला पूर्ण कल्पना आहे त्यामुळे येथील शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय शासन नक्की घेईल. 

अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना देखील पंचनामे झाल्यावर मदत जाहीर केली जाईल असे मुख्यमंत्री यांनी या प्रसंगी नमूद केले. 

तसेच तरुणांना रोजगार देण्यासाठी या भागात उद्योगधंदे आणण्यासाठी शासनाच्या वतीने प्रयत्न करू असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी बोलताना म्हणाले. 

कोणत्याही समाजावर अन्याय न होऊ देता मराठा समाजाला कायद्याच्या कसोटीवर टिकणारे आरक्षण नक्की मिळवून देऊ असेही मुख्यमंत्री यांनी सांगितले.

शासन आपल्या दारी या कार्यक्रमांमध्ये विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले

परळी जिल्हा बीड येथे संपन्न झालेल्या शासन आपल्या दारी कार्यक्रमांमध्ये विविध विकास कामाचे भूमिपूजन संपन्न झाले. 

यावेळी परळी वैद्यनाथ तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील 286.68 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन संपन्न झाले त्याचबरोबर परळी एम.आय.डि.सी., कृषी महाविद्यालय, कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय, सोयाबीन संशोधन व प्रक्रिया केंद्र बीड, जिल्हाधिकारी कार्यालय बीड, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, कृषी भवन बीड, परळी शहर बस स्थानक, यासह विविध सुमारे 1500 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले.

तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती परळी अंतर्गत सिरसाळा तालुका परळी येथील कै. पंडित अण्णा मुंडे व्यापारी संकूलाचे लोकार्पण संपन्न झाले. Shasan Aplya Dari Programme 

परळी येथील शासन आपल्या दारी कार्यक्रमात 22 हजार लाभार्थ्यांना लाभाचे थेट वितरण करण्यात आले

परळी येथील शासन आपल्या दारी कार्यक्रमात कृषी, व सामाजिक न्याय, तसेच विविध विभागाच्या शासकीय योजनेतील 22000 लाभार्थ्यांना एकूण सुमारे 749 कोटी रुपयांच्या लाभाचे थेट वितरण करण्यात आले आहे अशी माहिती बीड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे. 

या कार्यक्रम प्रसंगी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले सर्वांच्या सहकार्यातून बीड जिल्ह्याची मागासलेपणाची ओळख पुसून समृद्ध विकसित जिल्हा अशी ओळख निर्माण करण्यासाठी एक दिलाने काम करू असा विश्वास यावेळी बोलताना पालकमंत्री तथा कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला तसेच या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे त्यांनी आभार मानले. 

या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषी मंत्री धनंजय मुंडे, माजी मंत्री पंकजा मुंडे, आमदार सुरेश धस, आमदार प्रकाश सोळंके, आमदार लक्ष्मण पवार, आमदार बाळासाहेब आजबे, आमदार नमिता मुंदडा, माजी मंत्री सुरेश नवले, माजी आमदार भीमराव धोंडे, बीड जिल्हा प्रशासनातील सर्व प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी, तसेच बीड जिल्ह्यातील अनेक लाभार्थी नागरिक यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. "Shasan Aplya Dari Programme" 

तुम्हाला ही बातमी आवडली असेल अशी आशा करतो धन्यवाद.

आयुष निदान व उपचार शिबिर यशस्वीपणे संपन्न Ayush Treatment Camp Successfully Organised

Post a Comment

0 Comments