मराठवाड्याचे हक्काचे पाणी मराठवाड्याला सोडणार उपमूख्यमंञी देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

Jaykwadi Dharnat pani yenar
Water will be released in Jayakwadi dam

Water will be released in Jayakwadi dam मराठवाड्यातील जायकवाडी धरणामध्ये ऊर्ध्व गोदावरी खोऱ्यातील धरणातून पाणी सोडण्यात येणार असल्याची घोषणा महाराष्ट्र राज्याचे उपमूख्यमंञी तथा जलसंपदा मंञी देवेंद्र फडणवीस यांनी आज दिनांक 19/12/2023 रोजी विधान परीषदेत केली.

विधान परीषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या बाबतचा प्रश्न विधान परीषदेत उपस्थीत केला होता या प्रश्नाला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी ही महत्वपूर्ण घोषणा केली.

जाणून घेऊ या विषयी सविस्तर माहीती.

मराठवाड्याचे हक्काचे पाणी  मराठवाड्याला सोडणार उपमूख्यमंञी देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

ऊर्ध्व गोदावरी खोऱ्यातील धरणातून मराठवाड्याच्या हक्काचे पाणी मराठवाड्याला सोडण्यात येणार असून यावर्षीचे पाणी २४ नोव्हेंबर २०२३ रोजी सोडण्यात आले असल्याची माहिती उपमुख्यमंत्री तथा जलसंपदामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत दिली. 'Water will be released in Jayakwadi dam' 

मराठवाड्यातील जायकवाडी धरणामध्ये ऊर्ध्व गोदावरी खोऱ्यातील धरणातून पाणी सोडण्याबाबतचा प्रश्न विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपस्थित केला होता. त्यावेळी श्री. फडणवीस बोलत होते. 

या चर्चेत सदस्य एकनाथ खडसे, बाबाजानी दुर्राणी, सुरेश धस यांनी सहभाग घेतला.

मेंढेगिरी समितीच्या समन्यायी तत्वानूसार मराठवाड्याला हक्काचे पाणी सोडले जाते - देवेंद्र फडणवीस

विधान परीषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मराठवाड्याला हक्काचे पाणी सोडणे बाबतचा प्रश्न उपस्थित केला होता या प्रश्नाला उत्तर देताना उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की मेंढेगिरी समितीच्या समन्यायी तत्वानुसार मराठवाड्याला हक्काचे पाणी सोडण्यात येत असते. परंतु, स्थानिक परिस्थितीनुसार पाणी सोडण्याचा कालावधी पुढे-मागे होत असतो. 
मा.न्यायालयातही मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासाठी शासन ठाम भूमिका घेईल. 

पुढील काळात पिण्याच्या पाण्याच्या नियोजनासाठी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती आहे, ती पिण्याच्या पाण्याचे नियोजन करेल, असेही यावेळी सांगण्यात आले. "Water will be released in Jayakwadi dam"

तूम्हाला ही बातमी आवडली असेल अशी आशा करतो धन्यवाद .

Post a Comment

0 Comments