एक डिसेंबर हा दिवस जगभरात जागतिक एड्स दिन म्हणून साजरा केला जातो. यानुसार महाराष्ट्र राज्यातील बीड येथे जागतिक एड्स दिन साजरा करण्यात आला.
जाणून घेऊ या विषयी सविस्तर माहिती.
जागतिक एड्स दिन प्रभात फेरी काढून साजरा
जगभरात सर्वत्र एक डिसेंबर हा दिवस जागतिक एड्स दिवस म्हणून साजरा केला जातो दरवर्षी प्रमाणे याही वर्षी महाराष्ट्र राज्यातील बीड शहरामध्ये जागतिक एड्स दिन साजरा करण्यात आला. 'World aids day celebrated'
जागतिक एड्स दिनाची सुरुवात प्रभात फेरी काढून करण्यात आली तसेच दिवसभरात विविध स्पर्धांचे आयोजन ही स्वतंत्रपणे करण्यात आले लहान मुलांना खाऊ व फळांचे वाटप करून हा दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.
(Naco) राष्ट्रीय एड्स नियंत्रण संघटन दिल्ली व (Msacs) महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी 1 डिसेंबर रोजी जागतिक एड्स दिनानिमित्त रॅली, प्रभात फेरी व विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येते यानुसार बीड येथे हे सर्व कार्यक्रम यशस्वीपणे पार पडले.
जागतिक एड्स दिनानिमित्त शाळा महाविद्यालय व सेवाभावी संस्थांनी घेतला रॅलीमध्ये सहभाग
जागतिक एड्स दिनानिमित्त NACO दिल्ली आणि MSACS मुंबई यांच्या संयुक्त विद्यामाने आयोजित केलेल्या रॅलीमध्ये रोटरी क्लब ऑफ बीड, इन्फन्ट इंडिया सेवाभावी संस्था, बीड जिल्हा एड्स नियंत्रण कार्यालय, एआरटी सेंटर, विहान प्रकल्प, बँड पथक पोलीस विभाग, जिल्हा रुग्णालय बीड, सर्व शाळा व महाविद्यालय यांनी या रॅलीमध्ये उत्साहाने सहभाग घेतला या सर्वांनी शहरातील विविध भागांमध्ये जनजागृती संबंधित घोषणा देत व जनजागृतीचे फळक हाती घेत एड्स या आजाराबाबत जनजागृती रॅली काढली. World aids day celebrated
दिवसभरात विविध स्पर्धा व कार्यक्रमाचे आयोजन करून जागतिक एड्स दिन बीड येथे मोठ्या उत्साहाने व यशस्वीपणे साजरा करण्यात आला.
जागतिक एड्स दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक बडे, प्रभारी निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.संजय राऊत, निवासी वैद्यकीय अधिकारी बाह्य संपर्क डॉ.तांदळे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.माने, वैद्यकीय अधिकारी डॉ.पटेल, सुहास कुलकर्णी, विविध संस्थांचे पदाधिकारी, रोटरी क्लबचे कृष्णा खांडे, इन्फन्ट इंडिया संस्थेचे दत्ता बारगजे, यांच्यासह आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी यांनी घेतले परिश्रम
बीड येथे जागतिक एड्स दिन यशस्वीपणे साजरा करण्यात आला.
जागतिक एड्स दिन यशस्वी करण्यासाठी जिल्हा रुग्णालय बीड, जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कार्यालय बीड, एआरटी सेंटर व आयसीटीसी चे कर्मचारी सुहास कुलकर्णी, फसी इनामदार, इंगळे, जनार्दन माचपल्ले, घोडके, फसी फारूकी, विशाखा ढोले, संतोष नाईकनवरे, आदींनी परिश्रम घेतले व जागतिक एड्स दिन बीड येथे यशस्वी केला.
0 Comments