Ayush Treatment Camp |
Ayush Treatment Camp Successfully Organised महाराष्ट्र राज्यातील बीड शहरामध्ये राष्ट्रीय आयूष अभियान अंतर्गत मोफत आयुष निदान व उपचार शिबिराचे आयोजन जिल्हा रुग्णालय बीड व रोटरी क्लब बीड यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 30/12/2023 रोजी आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचा लाभ बीड जिल्ह्यातील व इतर जिल्ह्यातून आलेल्या अनेक नागरिकांनी घेतला.
या शिबिरास उत्सफूर्त प्रतिसाद मिळाला असून जाणून घेऊ या विषयी सविस्तर माहिती.
जिल्हा रुग्णालय बीड येथे आयुष सर्व रोग निदान व उपचार शिबिर यशस्वीपणे संपन्न
आयूष उपचार पद्धती या उपचार पद्धतीमध्ये आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी, निसर्गोपचार, व योगा या पारंपारिक व प्राचीन उपचार पद्धतीचा समावेश होतो. |
या उपचार पद्धतीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या उपचार पद्धतीचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत या उपचार पद्धतीचा आणखी एक महत्त्वाचा लाभ हा आहे की या उपचार पद्धतीमध्ये विविध रोगाचे मुळापासून समूळ उच्चाटन होण्यास मदत होते त्यामुळे आयुष उपचार पद्धतीकडे नागरिकांचा जास्त कल असल्याचे अलीकडील काळामध्ये दिसून येत आहे.
या पारंपारिक उपचार पद्धतीचा लाभ नागरिकांना विशेषतः ग्रामीण भागातील रुग्णांना मोफत घेता यावा या उद्देशाने आयुष निदान व उपचार शिबिराचे आयोजन जिल्हा रुग्णालय बीड व रोटरी क्लब बीड यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते हे सर्व रोग निदान व उपचार शिबिर जिल्हा शासकीय रुग्णालय बीड येथे यशस्वीपणे संपन्न झाले. 'Ayush Treatment Camp Successfully Organised'
या शिबिराचा लाभ एकूण 1235 रुग्णांनी घेतला या सर्व रुग्णांचे आयुष विभागातील डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी, व कर्मचारी यांनी रोग निदान करून त्यांच्यावर योग्य ते उपचार करण्यास सुरुवात केली आहे.
बीड जिल्ह्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अशोक बडे यांनी केले शिबिराचे उद्घाटन
Free Ayush Camp |
आयुष अभियान अंतर्गत जिल्हा रुग्णालय बीड येथे मधुमेह, स्थूलपणा, मुतखडा, मूत्रविकार, श्वसन विकार व इतर विविध आजारावर आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी, निसर्गोपचार व योग पद्धतीने उपचार व निदान करण्याचे आयूष निदान व उपचार शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटन कार्यक्रमाचे उद्घाटक व अध्यक्ष जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक बडे यांच्या हस्ते करण्यात आले. Ayush Treatment Camp Successfully Organised |
या प्रसंगी अतिरिक्त जिल्हाशल्यचिकीत्सक डॉ.नागेश चव्हाण, डॉ. एल.आर. तांदळे, जिल्हा आयुष अधिकारी डॉ. पुरुषोत्तम पिंगळे, रोटरी क्लब बीड चे अध्यक्ष प्रा. कृष्णा खांडे, रोटरी क्लबचे सुरज लाहोटी, संतोष पवार, गणेश साळुंखे, जिल्हा रुग्णालय बीडचे मेट्रन रमा गिरी, शासकीय नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या श्रीमती बेद्रे, होमिओपॅथी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेंद्र गौशाल, सोलापूर येथील होमिओपॅथी तज्ञ डॉ. हिरालाल अग्रवाल, युनानी तज्ञ डॉक्टर एफ.एम. शेख, यांची उपस्थिती होती. या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आयूष निदान व उपचार शिबिराचा उद्घाटन समारंभ पार पडला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन होमिओपॅथी तज्ञ डॉ. सचिन वारे यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्तविक परळी जिल्हा बीड येथील आयुष वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद कुलकर्णी यांनी केले.
शिबिराच्या प्रारंभी डॉ. सारडा,आनंद लिमकर, व तेलोरे यांनी योगा व प्राणायाम यांचे प्रात्यक्षिक सादर करून उपस्थितांची मने जिंकली. त्याचप्रमाणे या शिबिरामध्ये आयुर्वेद तज्ञ डॉ. दुर्गेश जोशी व डॉ. पदमश्री जोशी यांनी आयुर्वेदामधील अग्नीकर्म या उपचार पद्धतीचा अवलंब करून गरजू रुग्णावर आवश्यक उपचार केले. या वैशिष्ट्यपूर्ण शिबिरास उत्सफूर्त प्रतिसाद मिळाला असून उपचाराचा लाभ एकूण 1235 रुग्णांनी घेतला असल्याची माहिती आयुष विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. |
आयुष उपचार पद्धती प्रभावी व दुष्परिणाम रहीत असून रुग्णांनी याचा लाभ घ्यावा जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक बडे यांचे आवाहन
आयुष उपचार व निदान शिबिरामध्ये कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा रुग्णालय बीडचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक बडे यांनी मार्गदर्शनपर भाषण केले. यावेळी बोलताना डॉ. अशोक बडे म्हणाले की आयुष चिकीत्सा पद्धती प्रभावी असून दूष्परीणामरहीत आहे. |
ही चिकीत्सापद्धती उपचार घेण्यासाठी सोयीस्कर आहे असे सांगून या उपचार पद्धतीचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.
अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागेश चव्हाण आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की आंतरराष्ट्रीय स्तरावर आयूष उपचार पद्धतीकडे वाढता कल आहे. बीड जिल्ह्याचा आयुष विभाग महाराष्ट्रात आदर्श ठरावा यासाठी सर्वांनी परिश्रम घ्यावे असे नमूद करून बीड जिल्ह्यातील एकूण नऊ आरोग्य संस्थांमध्ये आयुष उपचार पद्धती उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले व या उपचार पद्धतीचा लाभ जवळच्या आरोग्य संस्थेमध्ये घ्यावा असे आवाहनही त्यांनी नागरिकांना केले.
तसेच रोटरी क्लब बीडचे अध्यक्ष कृष्णा खांडे, होमिओपॅथी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेंद्र गौशाल, आयुर्वेद तज्ञ डॉ. मनोज पोहनेरकर, आयुष विभाग प्रमुख डॉ. सचिन वारे यांनी सुद्धा आपले मनोगत यावेळी व्यक्त केले व उपस्थितांना महत्वपूर्ण मार्गदर्शन केले.
आयुष उपचार व निदान शिबिर यशस्वी करण्यासाठी यांनी घेतले परिश्रम
जिल्हा रुग्णालय बीड येथे संपन्न झालेले आयुष उपचार व निदान शिबिर यशस्वी करण्यासाठी डॉ. फुलचंद खाडे, डॉ.स्नेहल बुरांडे, डॉ. निखत शेख, डॉ. वैशाली वारे, डॉ. रत्नपारखी, डॉ. परवेज शेख, डॉ. मुख्तार सय्यद, डॉ. सबा फातेमा, डॉ. कृष्णा नागरगोजे, डॉ. फारुकी, डॉ. विजयालक्ष्मी, डॉ. निता शिरसाट, आयुष विभाग इनचार्ज वायकर, आनंद लिमकर, आकाश वाघमारे, आदींनी परीश्रम घेतले व हे शिबिर यशस्वी करण्यासाठी आपले महत्त्वाचे योगदान दिले. |
जिल्हाशल्यचिकीत्सक डॉ. अशोक बडे, अतिरिक्त जिल्हाशल्यचिकीत्सक डॉ. नागेश चव्हाण, डॉ.तांदळे यांच्या मार्गदर्शनाखाली हे आयुष निदान व उपचार शिबिर यशस्वीपणे संपन्न झाले.
तुम्हाला "Ayush Treatment Camp Successfully Organised" ही बातमी आवडली असेल अशी आशा करतो धन्यवाद.
शासन आपल्या दारी कार्यक्रम परळी जि.बीड येथे यशस्वीपणे संपन्न Shasan Aplya Dari Programme
0 Comments