मूख्यमंञी एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या कपाळी लावला विजयाचा गूलाल Eknath shinde celebrate victory with manoj jarange

Eknath shinde celebrate victory with manoj jarange
Eknath shinde celebrate victory with manoj jarange

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लोकशाही व शांततेच्या मार्गाने आंदोलन करत असलेले मनोज जरांगे पाटील व सकल मराठा समाजाचा विजय झाला असून सरकारने मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत.

स्वतः मूख्यमंञी एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे यांची भेट घेऊन त्यांचे उपोषण सोडवले व त्यांच्या सोबत विजयोत्सव व आनंदोत्सव साजरा केला. जाणून घेऊ या विषयी सविस्तर माहीती.

मूख्यमंञी एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या कपाळी लावला विजयाचा गूलाल

मराठा समाजाला टिकणारे आरक्षण मिळावे यासह विविध मागण्यांसाठी मुंबईच्या वेशीवर येऊन आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांची वाशी येथील शिवाजी चौकात महाराष्ट्र राज्याचे मूख्यमंञी एकनाथ शिंदे यांनी भेट घेऊन त्यांच्या आंदोलनाची यशस्वी सांगता केली. 'Eknath shinde celebrate victory with manoj jarange'

त्यासोबत त्यांना मोसंबीचे ज्यूस पाजून त्यांचे उपोषणही सोडवले. 

यावेळी महाराष्ट्राचे मूख्यमंञी एकनाथ शिंदे यांनी मराठीजनांचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. 

व तसेच मनोज जरांगे पाटील यांच्या कपाळी विजयाचा गुलाल लावला. 

तसेच मनोज जरांगे पाटील यांनी सूद्धा मूख्यमंञी एकनाथ शिंदे यांना पेढा भरवला.

हा विजय हा सकल मराठा समाजाचा आणि त्यासाठी जीवाची बाजी लावून झुंजलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या संघर्षाचा विजय असल्याचे मत मूख्यमंञी एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. 

तसेच गेले सात दिवस कोणतेही गालबोट लागू न देता अत्यंत शिस्तबद्ध पध्दतीने हे आंदोलन यशस्वी केल्याबद्दल सकल मराठा समाजाचे मूख्यमंञी एकनाथ शिंदे यांनी कौतुक आणि अभिनंदन केले. 

मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या सर्व मागण्या राज्य शासनाने मान्य केल्या असून कुणबी नोंदी शोधताना सगेसोयऱ्यांचा देखील त्यात समावेश करण्यात येणार आहे. 

यासोबतच शिंदे समितीला मुदतवाढ द्यायला मान्यता दिली आहे. 

तसेच मराठा आंदोलनकर्त्यांवरील गुन्हे मागे घेण्याबाबत देखील तयारी दर्शवली. 

यासोबतच मराठा आंदोलनात जे बांधव मृत्युमुखी पडले त्यांना देखील नुकसान भरपाई देण्याचे मूख्यमंञी यांनी मान्य केले. 

हा विजय मराठा समाजाचा असून गुलाल उधळून आनंद साजरा करावा सरकार आपल्यासोबत असल्याचे आवाहन मूख्यमंञी यांनी सकल मराठा समाजाला केले. 

या प्रसंगी मंत्री गिरीश महाजन, मंत्री मंगलप्रभात लोढा, दीपक केसरकर, आमदार संजय शिरसाट, सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे, मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे विशेष कार्यकारी अधिकारी मंगेश चिवटे आदी उपस्थित होते. "Eknath shinde celebrate victory with manoj jarange" 

तूम्हाला हा लेख आवडला असेल अशी आशा करतो धन्यवाद. 

Post a Comment

0 Comments