देशात दरवर्षी 30 जानेवारी या दिवशी हूतात्मा दिन साजरा करण्यात येतो सालाबाद प्रमाणे या वर्षीसूद्धा राज्यात सर्वञ हूतात्मा दिन साजरा करण्यात येणार आहे.
या बाबतचे परीपञक दिनांक 12 जानेवारी 2024 रोजी राज्य शासनाने निगर्मित केले असून यानूसार सर्व शासकीय कार्यालयामध्ये हूतात्मा दिन साजरा करण्याचे निर्देश राज्य शासनाने दिले आहेत.जाणून घेऊ या विषयी सविस्तर माहीती.
राज्यात सर्वञ साजरा करण्यात येणार हूतात्मा दिन
देशासाठी बलिदान दिलेल्या हूतात्म्याच्या स्मरणार्थ देशामध्ये सर्वत्र हूतात्मा दिन दरवर्षी 30 जानेवारी रोजी साजरा करण्यात येतो. 'Hutatma Din Celebration Guidelines'
त्यानूसार हा दिवस महाराष्ट्रातही सर्वञ हूतात्मा दिन म्हणून साजरा करण्यात येतो.
सालाबाद प्रमाणे या वर्षीसूद्धा राज्यात 30 जानेवारी 2024 रोजी हूतात्मा दिन साजरा करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. या बाबतचे परीपञक महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने दिनांक 12 जानेवारी 2024 रोजी प्रसिद्ध केले आहे.
दोन मिनिटे मौन पालून हूतात्म्यांना वाहण्यात येणार आदरांजली
देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपले प्राण अर्पण केलेल्या हूतात्म्याच्या स्मरणार्थ आदर व्यक्त करण्यासाठी दिनांक 30 जानेवारी रोजी दरवर्षी संपूर्ण देशभर दोन मिनिटे मौन स्तब्धता पाळून त्यांना आदरांजली वाहण्यात येते. Hutatma Din Celebration Guidelines
त्यानूसार यावर्षीही मंगळवार दिनांक 30 जानेवारी 2024 रोजी सकाळी ठीक 11 वाजता दोन मिनिटे मौन स्तब्धता पाळून हा दिवस हुतात्मा दिन म्हणून पाळण्यात यावा असे निर्देश शासनाने दिले आहेत.
अशा पद्धतीने मौन स्तब्धता पाळण्यात येणार
दिनांक 30 जानेवारी 2024 रोजी सकाळी ठीक अकरा वाजता पाळण्यात यावयाच्या मौन स्तब्धताची सूरवात होण्यापूर्वी सकाळी ठीक 10.59 वाजेपासून 11.00 वाजेपर्यंत इशारा भोंगा वाजविण्यात येईल.
सदरील इशारा भोंगा संपल्यानंतर सर्व शासकीय,निमशासकीय कार्यालये,अस्थापना,शैक्षणिक संस्था,विद्यापीठे, यामधील अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी,व तसेच नागरीक आदी सर्वांनी दोन मिनिटे मौन स्तब्धता पाळावी.
यानंतर सकाळी ठीक 11.02 मिनिटांनी मौन स्तब्धता संपल्यासंबधीचा इशारा भोंगा सकाळी ठीक 11.03 मिनिटांपर्यंत वाजविण्यात येईल.
जेथे भोंग्याची व्यवस्था नसेल तेथे वरीलप्रमाणे ठीक सकाळी 11.00 वाजता मौन स्तब्धता पाळण्याबाबत योग्य ते निर्देश संबधितांना देण्यात यावेत व हूतात्म्यांना आदरांजली गंभीरपणे व योग्य त्या आदराने मौन स्तब्धता पाळून देण्यात येईल याची दक्षता घेण्यात यावी.
या प्रमाणे वरील मार्गदर्शक सूचनेनूसार हूतात्मा दिन पाळण्याचे निर्देश राज्य शासनाने दिनांक 12 जानेवारी 2024 रोजीच्या परीपञकानूसार दिले आहेत. "Hutatma Din Celebration Guidelines"
तूम्हाला हा लेख आवडला असेल अशी आशा करतो धन्यवाद.
0 Comments