Cabinet Meeting Decision राज्य शासनाची मंत्रिमंडळ बैठक दिनांक 10 जानेवारी 2024 रोजी संपन्न झाली.
या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये नऊ महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत जाणून घेऊ या या विषयी सविस्तर माहिती.
10 जानेवारी 2024 रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले नऊ महत्त्वाचे निर्णय
महाराष्ट्र शासनाची मंत्रिमंडळ बैठक महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. 'Cabinet Meeting Decision'
या बैठकीला राज्य मंत्रिमंडळाचे सदस्य उपस्थित होते. या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये खालील नमूद नऊ महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.
1) राज्यातील नागरी भागात बाल विकास केंद्र.
कुपोषणावर मात करण्यासाठी ग्रामीण बाल विकास केंद्र योजनेच्या धर्तीवर नागरी भागातील अतितीव्र कुपोषित बालकांसाठी नागरी बाल विकास केंद्र योजना सुरू करण्यास राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.
एकात्मिक बाल विकास सेवा योजनेतील राज्यातील 104 नागरी प्रकल्पामध्ये ही योजना राबविण्यात येणार आहे.
या योजनेसाठी वार्षिक अंदाजे 11 कोटी 52 लाख इतक्या खर्चास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.
2) राज्यात न्यायिक अधिकाऱ्यांची 2863 व सहाय्यभूत 11 हजार 64 पदे भरण्यास मान्यता.
राज्यात न्यायिक अधिकाऱ्यांची अतिरिक्त 2863 पदे तसेच सहाय्यभूत 11064 पदे निर्माण करण्याबाबत व 5803 मनूष्यबळ बाह्ययंञणेद्वारे उपलब्ध करून घेण्यास मंञीमंडळाने मान्यता दिली आहे.
तसेच मंजूर पदावरील भरती ही टप्प्याटप्प्याने करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
3) सत्यशोधक मराठी चित्रपटास राज्य वस्तू व सेवा करातून सूट.
सत्यशोधक मराठी चित्रपटास राज्य वस्तू सेवा कराच्या प्रतिपूर्तीस मंजुरी देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे.
शिक्षण आणि सामाजिक प्रेरणादायी विचारांना चालना देणारा हा चित्रपट मंत्रिमंडळातील सर्व सदस्यांसह अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पहावा यासाठी विशेष खेळाचे आयोजन करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत.
4) विरार येथील जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्रातील कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी योजना व सेवानिवृत्ती वेतन योजना लागू करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे.
5) पंडित दीनदयाल उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजने अंतर्गत घरकुल बांधकामासाठी भूमीहीन लाभार्थ्यांना जागा खरेदीसाठी द्यावयाच्या अनुदानात वाढ करून 50 हजार रुपयांवरून ते एक लाख रुपये करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे.
6) श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा व छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त पात्र शिधापत्रिकाधारकांना प्रति शिधापत्रिका आनंदाचा शिधा देण्यास मंजुरी.
7) पेढी बॅरेज उपसा सिंचन योजना कोथेरी लघु पाटबंधारे प्रकल्प बाधितांना आर्थिक पॅकेज मंजूर करण्यात आले आहे.
8) ग्रामविकास विभागातील योजनांच्या जाहिरात व प्रसिद्धीसाठी नवीन लेखाशिर्ष उघडण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
9) शासकीय लेख्यातून (मकोनी नमुना क्रमांक ४४ द्वारे) आहरित केलेल्या सहायक अनुदानाच्या जलद संवितरण व संनियंत्रणासाठी आहरण व संवितरण अधिकाऱ्यांकरिता आभासी वैयक्तिक ठेव लेखा कार्यपद्धती लागू करण्यास मंजुरी.
वरीलप्रमाणे हे नऊ महत्वपूर्ण निर्णय दिनांक 10 जानेवारी 2024 रोजीच्या मंञीमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आले आहेत. "Cabinet Meeting Decision"
तूम्हाला हा लेख आवडला असेल अशी आशा करतो धन्यवाद.
0 Comments