Governor of Maharashtra Hoisted the Flag महाराष्ट्र राज्याचे महामहीम राज्यपाल मा.रमेश बैस यांच्या हस्ते मूंबई येथे भारतीय प्रजासत्ताक दिनानिम्मित्त ध्वजारोहण करण्यात आले. जाणून घेऊ या बाबत सविस्तर माहीती.
मूंबईतील शिवाजी पार्क येथे राज्यपाल मा.रमेश बैस यांनी केले ध्वजारोहण
भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त आज दिनांक 26 जानेवारी 2024 रोजी मुंबईतील छत्रपती शिवाजी पार्क येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल श्री.रमेश बैस यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. 'Governor of maharashtra hoisted the flag'
यावेळी महाराष्ट्र राज्याचे मूख्यमंञी एकनाथ शिंदे यांनी उपस्थित राहून ध्वजवंदन केले.
यावेळी बोलताना महामहिम राज्यपाल रमेश बैस यांनी गेल्या वर्षभरात राज्य सरकारने केलेल्या विविध विकासकामांचा आढावा घेतला.
तसेच राज्यातील सर्व स्तरातील नागरिकांना न्याय देण्यासाठी शासनाने घेतलेल्या निर्णयाचे कौतुक केले.
अटल सेतू, कोस्टल रोड, धारावी विकास, मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील क्षमतावाढ प्रकल्प, मुंबई-सिंधुदुर्ग ग्रीन फिल्ड हायवे या प्रकल्पांमुळे राज्याचा सर्वांगीण विकासात मोलाची भर पडणार असल्याचे मा.राज्यपाल महोदय यांनी आवर्जून नमूद केले.
यावेळी देशाची सुरक्षा सांभाळणारे भारतीय नौदल, गोवा पोलीस, एसआरपीएफ, मुंबई पोलीस दल, दंगल नियंत्रण पथक, महिला पोलिसांचे पथक, सी-60 पोलिसांचे पथक, रेल्वे पोलीस दल अशा विविध संरक्षण दलांनी शानदार संचलन केले.
तसेच राज्य शासनाचे नगरविकास, मृद आणि जलसंधारण, उमेद, अल्पसंख्याक विभाग, आदिवासी विकास अशा विविध विभागांचे चित्ररथ देखील या संचलनात सहभागी झाले होते.
या प्रसंगी लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी, पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते. "Governor of maharashtra hoisted the flag"
तूम्हाला ही बातमी आवडली असेल अशी आशा करतो धन्यवाद.
0 Comments