Maratha Arakshan Meeting Maharashtra |
Maratha Arakshan Meeting Maharashtra मराठा आरक्षण विषयक बैठक मूख्यमंञी एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृष्य प्रणालीद्वारे दिनांक 20 जानेवारी 2024 रोजी आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीमध्ये मूख्यमंञी एकनाथ शिंदे यांनी अनेक महत्वाच्या सूचना राज्यातील अधिकाऱ्यांना दिल्या जाणून घेऊ या विषयी सविस्तर माहीती.
मराठा आरक्षण विषयक बैठक संपन्न Maratha Arakshan Meeting Maharashtra
मराठा समाजाचे सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक मागासलेपण तपासण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगामार्फत २३ जानेवारीपासून युद्धपातळीवर सुरु होणाऱ्या सर्वेक्षणासाठी सर्व शासकीय यंत्रणा सज्ज ठेवण्याची तसेच या कामाला सर्वोच्च प्राधान्य देऊन कालबद्धरितीने अचूक सर्वेक्षण करण्याचे निर्देश महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. 'Maratha Arakshan Meeting Maharashtra'
गावोगावी दवंडी द्या, सूचना फलकांवर माहिती द्या, लोकांना या सर्वेविषयी कळू द्या असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.
मराठा आरक्षणविषयक बैठकीत राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त यांच्याशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दूरदृश्य प्रणालीद्वारे बोलत होते.
मराठा समाजाला टिकणारं व कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध - मूख्यमंञी
मागासवर्ग आयोगाच्या सर्वेक्षणाचे काम २३ जानेवारी ते ३१ जानेवारी 2024 पर्यंत होणार असून मराठा व बिगर मराठा खुला प्रवर्गाचे सर्वेक्षण करण्यात येईल अशा रीतीने राज्यातील अंदाजे अडीच कोटी कुटूंबांचे सर्वेक्षण होणार आहे. Maratha Arakshan meeting Maharashtra
याकामी गोखले इन्स्टिट्युट, आयआयपीएस, या नामांकित संस्थांची मदत होणार आहे.
मराठा समाजाला टिकणारं आणि कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण मिळवून देण्यासाठी राज्यशासन कटिबध्द असून प्रशासनाने सुध्दा या अतिशय महत्वाच्या कामामध्ये पूर्णशक्ती एकवटून एक सामाजिक भावनेने हे काम करावे असे आवाहनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केले.
३६ जिल्हे, २७ नगरपालिका, ७ कॅन्टोनमेंट क्षेत्रात प्रशिक्षण आजपासून सुरु झाले आहे. प्रगणकांचे तसेच अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण अतिशय व्यवस्थितपणे करा तसेच आपल्या अहवालात देखील प्रशिक्षण सत्र, बैठका या सर्व बाबींचे रेकॉर्ड ठेवा. न्या गायकवाड अहवालातील त्रुटी दूर करणे गरजेचे आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, २००८ मधील अहवाल आणि सध्याचा मागासवर्ग आयोगाचा अहवाल यात नेमका काय फरक आहे आणि नव्याने कसा हा इंटेन्सिव्ह डेटा संकलित करण्यात येत आहे हे व्यवस्थित तयार करण्याच्या सुचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या.
कूणबी नोंदीची प्रकरणे तातडीने निकाली काढण्यासाठी तज्ज्ञांचे पथक नेमण्यात यावे - मूख्यमंञी एकनाथ शिंदे
कुणबी नोंदीबाबत वंशावळी जुळविणे महत्वाचे असून नोंदीची प्रकरणे तातडीने निकाली काढण्यासाठी बार्टी तसेच इतर सक्षम संस्थेच्या तज्ज्ञांचे पथक तातडीने नेमण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला दिले.
या पथकात मोडी भाषा तज्ज्ञ, तहसीलदार यांचा समावेश करा.
ज्या गावांत अत्यल्प नोंदी सापडल्या आहेत तिथे परत खातरजमा करण्यासाठी विशेष मोहीम राबवा, दवंडी द्या, तसेच पोलीस पाटील व खासगी व्यक्तींकडे काही कागदपत्रे असतील तर तीही स्वीकारा असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.
एकट्या मराठवाड्यात ३२ हजार नोंदी आढळल्या असून १८ हजार ६०० कुणबी प्रमाणपत्रे दिली आहेत.
न्या. संदीप शिंदे समितीने लातूर, मराठवाड्यात बैठकीची दुसरी फेरी पण पूर्ण केली आहे, असे सचिव सुमंत भांगे यांनी बैठकीत सांगितले.
अशाप्रकारे मराठा आरक्षण विषयक ही महत्वपूर्ण बैठक दूरदृष्य प्रणालीद्वारे यशस्वीपणे संपन्न झाली.
या बैठकीत आरक्षण संदर्भात महत्त्वाचे निर्देश व मार्गदर्शक सूचना मूख्यमंञी एकनाथ शिंदे यांनी बैठकीला उपस्थित सर्व अधिकारी यांना दिल्या. "Maratha Arakshan Meeting Maharashtra"
तूम्हाला ही बातमी आवडली असेल अशी आशा करतो धन्यवाद.
0 Comments