एक राष्ट्र एक निवडणूक घेण्यासंदर्भात सूचना मागविण्यात आल्या आहेत 15 जानेवारी 2024 पर्यंत देता येतील सूचना One Nation One Election Notification

One nation one election notification
One nation one election notification

One nation one election notification मित्रांनो एक महत्त्वाची अपडेट आली आहे. 

देशामध्ये एक राष्ट्र एक निवडणूक घेण्यासंदर्भात सामान्य नागरिकांकडून सूचना मागविण्यात आल्या आहेत. 

या बाबतची सार्वजनिक सूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. जाणून घेऊ याबाबत सविस्तर माहिती.

एक राष्ट्र एक निवडणूक सामान्य नागरिकांच्या सदस्यांकडून मागविण्यात आल्या सूचना

देशामध्ये एकाच वेळी सर्व निवडणुका घेण्याची बाब केंद्र शासनाच्या विचाराधीन आहे त्या अनुषंगाने एक राष्ट्र एक निवडणूक घेणे संदर्भात माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या नेतृत्वाखाली उच्चस्तरीय समिती गठित करण्यात आलेली आहे. 'One nation one election notification'

या समितीची स्थापना केंद्र शासनाच्या दिनांक दोन सप्टेंबर 2023 रोजीच्या अधिसूचनेनुसार करण्यात आलेली आहे. 

या समितीने देशात एकाच वेळी निवडणुका घेण्यासाठी विद्यमान कायदेशीर प्रशासकीय संरचनेत योग्य ते बदल करण्यासाठी सामान्य जनतेच्या सदस्यांकडून सूचना मागविल्या आहेत.

दिनांक 15 जानेवारी 2024 पर्यंत प्राप्त झालेल्या सर्व सूचना उच्चस्तरीय समिती समोर विचारार्थ ठेवल्या जाणार आहेत.

एक राष्ट्र एक निवडणूक घेण्यासंदर्भात स्थापन केलेल्या समितीची कार्ये

एक राष्ट्र एक निवडणूक घेण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या उच्चस्तरीय समितीने कायमस्वरूपी एकाच वेळी निवडणूक घेण्यासाठी संविधान आणि संबंधित निवडणूक कायद्यामध्ये आवश्यक दुरुस्त्या ओळखणे, समान मतदार यादी तयार करणे, लॉजिस्टिकची व्यवस्था करणे, इत्यादी करिता योग्य कायदेशीर आणि प्रशासकीय चौकट तयार करण्यासाठी शिफारशी करणे इत्यादी कार्ये एक राष्ट्र एक निवडणूक संदर्भात स्थापन केलेल्या समितीची आहेत. one nation one election notification

एक राष्ट्र एक निवडणूक साठी अशा पद्धतीने पाठविता येतील सूचना

एक राष्ट्र एक निवडणूक घेण्यासाठी स्थापन केलेल्या समितीने सामान्य जनतेच्या सदस्याकडून दिनांक 15 जानेवारी 2024 पर्यंत सूचना मागविल्या आहेत या सूचना onoe.gov.in या वेबसाईटवर किंवा sc-hlc@gov.in वर ई-मेल द्वारे किंवा खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाद्वारे पाठविण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे.

पोस्टाद्वारे सूचना पाठवण्याचा पत्ता.

मा.सचिव 
उच्चस्तरीय समिती एक राष्ट्र एक निवडणूक 
जोधपुर ऑफिसर्स होस्टेल ब्लॉक क्रमांक 9 नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट्स जवळ सी हेक्सागॉन इंडिया गेट सर्कल नवी दिल्ली.

अशा पद्धतीने योग्य त्या सूचना उच्चस्तरीय समितीस पाठविल्या जाऊ शकतात. 

तुम्हाला "One nation one election notification" हा लेख आवडला असेल अशी आशा करतो धन्यवाद.

Post a Comment

0 Comments