Pradhanmantri Awas Yojana Maharashtra सोलापूर येथे प्रधानमंञी नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रधानमंञी आवास योजना अंतर्गत पंधरा हजार घरांचे लोकार्पण संपन्न झाले आहे. जाणून घेऊ या विषयी सविस्तर माहीती.
प्रधानमंञी आवास योजने अंतर्गत प्रधानमंञी नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पंधरा हजार घरांचे लोकार्पण संपन्न
सोलापूर जिल्ह्यातील रे नगर मध्ये प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत बांधण्यात येणाऱ्या ३० हजार घरांपैकी पहिल्या टप्प्यातील १५ हजार घरांचे लोकार्पण आज दिनांक 19 जानेवारी 2024 रोजी संपन्न झाले. 'Pradhanmantri Awas Yojana Maharashtra'
यावेळी झालेल्या कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते लाभार्थ्यांना चावी वाटप करण्यात आले.
याच सोहळ्यात अमृत २.० योजनेतील राज्यातील ४ महानगर पालिका आणि ३ नगर पालिकांच्या एकूण १ हजार २०१ कोटी रुपये खर्चाच्या ७ पाणीपुरवठा आणि एका मलनिस्सारण प्रकल्पांचे भूमिपूजन, करण्यात आले.
तसेच पीएम स्वनिधी लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात निधी हस्तांतरण प्रमाणपत्र देखील यावेळी प्रदान करण्यात आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या रे नगर वसाहतीचे भूमिपूजन करण्यात आले होते.
आज त्यांच्याच हस्ते देशातील सगळ्यात मोठ्या कामगार वसाहतीतील घरांचे चावी वाटप संपन्न होत आहे.
यावेळी व्यासपिठावर उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. महाराष्ट्र राज्याचे मूख्यमंञी एकनाथ शिंदे यांनी सूद्धा आपले मनोगत व्यक्त केले यावेळी बोलताना ते म्हणाले की रे म्हणजे आशेचा किरण, आज पंतप्रधान मोदी जी हेच गरिबांसाठी आशेचा किरण असून त्यांच्यामुळेच गरिबांचे जीवन प्रकाशमान झाले आहे.
तसेच नरसय्या आडम मास्तरांनी या गरिबांना हक्काचे घर मिळावे यासाठी भगीरथ प्रयत्न केले असून त्यांनी केलेल्या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी निश्चितच प्रयत्न करू असेही यावेळी महाराष्ट्र राज्याचे मूख्यमंञी एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सहकार्याने पायाभूत विकास प्रकल्प राज्यात राबविले जात आहेत - मूख्यमंञी एकनाथ शिंदे.
काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते समृद्धी महामार्ग आणि अटल सेतूचे लोकार्पण झाले होते. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सहकार्यानेच राज्यात सर्वाधिक पायाभूत विकास प्रकल्प राबविले जात आहेत असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे मूख्यमंञी एकनाथ शिंदे यांनी केले.
प्रधानमंञी नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संपन्न झालेल्या पंधरा घरांच्या लोकार्पण समारंभ प्रसंगी मोठ्या संख्येने नागरीक तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल मा. रमेश बैस, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंञी अजित पवार, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, खासदार डॉ.जयसिद्धेश्वर महास्वामी, खासदार रणजितसिंह निंबाळकर, आमदार चंद्रशेखर बावनकुळे, सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, विजयकुमार देशमुख, रे नगर हौसिंग फेडरेशनचे संस्थापक आणि मुख्य प्रवर्तक नरसय्या आडम आणि असंख्य कामगार प्रामूख्याने उपस्थित होते. "Pradhanmantri Awas Yojana Maharashtra"
तूम्हाला ही बातमी आवडली असेल अशी आशा करतो धन्यवाद.
0 Comments