Pradhanmantri Suryodaya Yojana प्रधानमंत्री सूर्योदय योजना या नवीन योजनेची घोषणा देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली आहे. जाणून घेऊ या विषयी सविस्तर माहिती.
प्रधानमंत्री सूर्योदय योजना - 2024 Pradhanmantri suryodaya yojana
केंद्र शासन देशाच्या विकासासाठी व कल्याणासाठी अनेक नवनवीन योजना राबवित असते याचप्रमाणे आता केंद्र शासनाच्या वतीने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी नवीन योजनेची घोषणा केली आहे.
या योजनेचे नाव आहे प्रधानमंत्री सूर्योदय योजना या योजनेचा लाभ देशातील सुमारे एक कोटी घरातील नागरिकांना होणार आहे. 'Pradhanmantri Suryodaya Yojana'
या योजने अंतर्गत भारतामध्ये एक कोटी घरांच्या गच्चीवर सौर ऊर्जा पॅनल लावले जाणार आहेत.
यामूळे नागरीकांना वीज व उर्जा मिळणार मिळणार आहे.
या योजनेचा लाभ गरीब व मध्यम वर्गातील नागरिकांना होणार असून नागरिकांचा वीज बिलाचा खर्च वाचणार आहे.
तसेच भारत देशाला ऊर्जेच्या क्षेत्रात आत्मनिर्भर होण्यास मदत होणार आहे.
गरीब व मध्यम वर्गातील नागरिकांना होणार प्रधानमंत्री सूर्योदय योजनेचा लाभ
प्रधानमंत्री सूर्योदय योजनेचा लाभ गरीब व मध्यम वर्गातील नागरिकांना होणार असून या घटकातील सर्व नागरिकांना या योजनेत समाविष्ट करण्याचा प्रयत्न केंद्र शासनाच्या वतीने केला जाणार आहे. pradhanmantri Suryodaya Yojana
सद्यस्थितीत या योजने संदर्भात केंद्र शासनाने कोणतेही दिशानिर्देश दिलेले नाही परंतु ज्या कुटुंबाचे उत्पन्न रूपये 2 लाख पेक्षा कमी आहे अशा कुटुंबांना या योजने अंतर्गत आणले जाणार आहे अशी माहिती मिळत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला प्रधानमंञी सूर्योदय योजनेचा निर्णय
घरांच्या गच्चीवर सोलर पॅनल लावल्यानंतर नागरिकांची विजेची समस्या मिटणार असून नागरिकांना सोलर पॅनलच्या माध्यमातून वीज व उर्जा मिळणार आहे.
या योजनेचा सर्वाधिक लाभ त्या राज्यातील लोकांना होणार आहे ज्या राज्यात विजेचे दर जास्त आहेत.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये या योजनेचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
त्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सूर्योदय योजना या महत्वकांशी योजनेची घोषणा केली आहे.
लवकरच "Pradhanmantri Suryoday Yojana" या योजनेची अंमलबजावणी केली जाणार आहे.
तुम्हाला हा लेख आवडला असेल अशी आशा करतो धन्यवाद.
0 Comments