केंद्र शासन पूरस्कृत योजनांच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र अग्रेसर असावा मूख्यमंञी एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन

Review Meeting of Government Schemes
Review Meeting of Government Schemes 

महाराष्ट्र राज्याचे मूख्यमंञी एकनाथ शिंदे यांनी विविध योजनांच्या अंमलबजावणी बाबत आढावा बैठक घेतली. 

या बैठकीमध्ये त्यांनी अनेक महत्वाच्या सूचना व निर्देश संबधित अधिकाऱ्यांना दिले. जाणून घेऊ या विषयी सविस्तर माहीती.

केंद्र शासन पूरस्कृत योजनांच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र अग्रेसर असावा मूख्यमंञी एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन 

मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे यांनी आज दिनांक 30 जानेवारी 2024 रोजी सह्याद्री अतिथीगृहात आयोजित बैठकीत केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना (नागरी), आयुष्मान भारत - प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, तसेच भारतनेट - महानेट प्रकल्प यांचा आढावा घेतला. 'Review Meeting of Government Schemes'

केंद्र पुरस्कृत योजनांच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र अग्रेसरच असला पाहिजे यासाठी तसेच प्रधानमंत्री आवास योजनेतून जास्तीत-जास्त घरे महाराष्ट्रात झाली पाहिजेत आणि महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर राहिला पाहिजे यासाठी काटेकोरपणे नियोजन करा, असे निर्देश मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी या बैठकीत दिले. 

आरोग्य विभागाच्या विविध योजनांचा आढावा घेतानाच महापालिकेच्या टीबी हॉस्पिटलचा कायापालट करण्यात यावा, असे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले.  

घरकुल योजनांच्या नागरी क्षेत्रातील संख्या वाढावी 

लाभार्थ्यांनी या योजनांमध्ये सहभागी व्हावे यासाठी घरकुल प्रकल्प स्थळे सर्व नागरी सुविधांनी परिपूर्ण असायला हवेत, याकडे लक्ष देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी बैठकीत दिले. गिरणी कामगारांच्या घरकुलांच्या प्रकल्पांनाही गती देण्यात यावी. यातून या वर्गाला मोठा दिलासा मिळणार आहे. त्यामुळे या प्रकल्पांच्या अमंलबजावणीवरही लक्ष देण्यात यावे, असेही निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

गृहनिर्माण विभागाच्या वतीने राज्यात जुलै २०२२ ते जानेवारी २०२४ या कालावधीत रखडलेले प्रकल्प पूर्ण करण्यास गती देण्यात आल्याची माहिती देण्यात आली. यात ३६ टक्क्यांनी वाढ होऊन उद्दिष्टपुर्ती ४ लाख ५ हजार ११७ घरे म्हणजेच ७२.५१ टक्क्यांवर पोहचल्याची माहिती देण्यात आली. 

आरोग्य विभागाने ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र खिडकी योजना सुरु करावी. 

जेष्ठ नागरीकांना उपचारासाठी रांगेत उभे राहावे लागू नये, तिष्ठत राहावे लागू नये अशी व्यवस्था करण्याचे निर्देश मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिले. 

सीमावर्ती भागातील ८६२ गावात महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेचा लाभ देण्याबाबतही ठोस पावले उचलण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केल्या.

मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाला टीबी हॉस्पिटलच्या सेवेत सुधारणा आणि तेथील सुविधांचे अद्ययावतीकरणाबाबत बैठकीतूनच मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दूरध्वनीवरून निर्देश दिले. 

राज्यात प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेतून आतापर्यंत ३५ लाख ३५ हजार ९१२ रुग्णांना लाभ देण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली. यासाठीच्या विमा सुरक्षा योजनेतून शंभर टक्क्यांहून अधिक दाव्यांच्या रक्कमेची प्रतिपुर्ती मिळवण्यात आल्याचे सांगण्यात आले. यावर्षी ८३९ कोटी ८१ लाख रुपयांची विमा प्रतिपुर्ती झाली आहे. 

आगामी काळातील युनिव्हर्सल हेल्थ कव्हरेज या योजनेतून राज्यातील २ कोटी ७२ लाख कुटुंबांना म्हणजेच सर्वच लोकसंख्येला प्रति कुटुंब पाच लाख रुपयांची वैद्यकीय विमा सुरक्षा मिळणार आहे. यातून उपचारांच्या प्रकारांची संख्याही वाढणार आहे. तर याअंतर्गत येणाऱ्या रुग्णालयांची संख्याही हजार वरून १ हजार ९०० वर पोहचणार असल्याची माहिती देण्यात आली. 

भारत नेट -२ अंतर्गत महानेट - १चे ९६ टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती या बैठकीत देण्यात आली. ऑप्टिकल फायबर केबलचे जाळे टाकण्याचे काम ९६ टक्क्यांपर्यंत झाले आहे. यातून १४० तालुक्यांना तसेच राज्यातील ९ हजार १४६ ग्रामपंचायती महानेटशी जोडल्या गेल्या आहेत.

या महत्त्वाच्या आढावा बैठकीला मुख्यमंत्र्यांचे सल्लागार मनोज सौनिक, गृहनिर्माण विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव वल्सा नायर-सिंह, सार्वजनिक आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव डॉ. के. एच. गोविंदराज, तसेच असीमकूमार गुप्ता, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह,  माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव पराग जैन-नैनुटिया, माहिती तंत्रज्ञान विभागाच्या संचालक जयश्री भोज, नियोजन विभागाचे प्रधान सचिव एन. रामास्वामी आदींची उपस्थिती होती. "Review Meeting of Government Schemes"

तूम्हाला हा लेख आवडला असेल अशी आशा करतो धन्यवाद

Post a Comment

0 Comments