Sahveej Nirmiti Prakalp Sathi Bhag Bhandwal Manjur महाराष्ट्र राज्यामध्ये सहकारी साखर कारखान्या मार्फत सहवीज निर्मिती प्रकल्प राबविणे बाबतचे धोरण निश्चित करण्यात आले आहे.
यासाठी राज्य शासनाने सहकारी साखर कारखान्यांना पाच टक्के भाग भांडवल मंजूर केले असून या बाबतचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाने प्रसिद्ध केला आहे. जाणून घेऊ या विषयी सविस्तर माहिती.
सहकारी साखर कारखान्यां मार्फत सहवीज निर्मिती प्रकल्प राबविण्यात येणार
महाराष्ट्र राज्यामध्ये सहकारी साखर कारखान्या मार्फत सहवीज निर्मिती प्रकल्प राबविणे बाबतचे धोरण महाराष्ट्र शासनाच्या दिनांक 20/2/2008 रोजीच्या शासन निर्णयान्वये निश्चित करण्यात आले आहे. 'Saveej Nirmiti Prakalp Sathi Bhag Bhandwal Manjur'
या धोरणानुसार राज्यात सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून येत्या तीन वर्षात सहवीज निर्मिती प्रकल्पामधून 1000 मेगावॅट वीज निर्मिती करण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे.
तसेच या धोरणानुसार सहवीज निर्मिती प्रकल्प राबविणाऱ्या सहकारी साखर कारखान्यांना प्रकल्प खर्चाच्या पाच टक्के शासकीय भाग भांडवल मंजूर करण्यात येणार आहे. यासाठी सहा सहकारी साखर कारखाने पात्र ठरले आहेत.
हे सहा सहकारी साखर कारखाने सहवीज निर्मिती प्रकल्प राबविण्यासाठी पात्र ठरले आहेत
रेणा सहकारी साखर कारखाना तालुका रेणापुर जिल्हा लातूर, ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना लि.भेंडे तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर, शरद सहकारी साखर कारखाना नरंदे जिल्हा कोल्हापूर, कुकडी सहकारी साखर कारखाना पिंपळगाव पिसा तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर, स.म. शिवाजीराव नागवडे श्रीगोंदा सहकारी साखर कारखाना लि.अहमदनगर, व राजाराम बापू सहकारी साखर कारखाना लि.राजाराम नगर साखराळे जिल्हा सांगली, हे सहा सहकारी साखर कारखाने राज्यात सहवीज निर्मिती प्रकल्प राबविण्यासाठी पात्र ठरले आहेत.
या सहा सहकारी साखर कारखान्यांना रुपये चाळीस लाख इतके शासकीय भाग भांडवल सहवीज निर्मितीसाठी दिनांक 31 मे 2023 रोजीच्या शासन निर्णयानुसार वितरित करण्यात आलेले आहे.
आता या सहा सहकारी साखर कारखान्यांना रुपये दोन कोटी चाळीस लाख इतके शासकीय भाग भांडवल सहवीज निर्मिती प्रकल्पासाठी शासनाने मंजूर केले आहे.
या बाबतचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने दिनांक 3 जानेवारी 2024 रोजी प्रसिद्ध केला आहे.
सविस्तर शासन निर्णय वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
तुम्हाला "Sahveej Nirmiti Prakalp Sathi Bhag Bhandwal Manjur" हा लेख आवडला असेल अशी आशा करतो धन्यवाद.
0 Comments