Shetkari Yojana Maharashtra शेतकऱ्यांना अल्पमुदत पीक कर्ज पुरवठा करण्यासाठी एक टक्का व्याज दराने अर्थसहाय्य करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे.
यामुळे शेतकऱ्यांना सात टक्के ऐवजी 6% व्याजदराने पीक कर्जाचा लाभ मिळणार असून एक टक्के व्याजदराचे अर्थसहाय्य राज्य शासन करणार आहे.
या बाबतचा शासन निर्णय राज्य शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने दिनांक 8 जानेवारी 2024 रोजी प्रसिद्ध केला आहे. जाणून घेऊ या बाबत सविस्तर माहिती.
शेतकऱ्यांना अल्पमूदत पीक कर्ज पुरवठा करण्यासाठी एक टक्के व्याजदराचे अर्थसहाय्य करण्यास राज्य शासनाची मान्यता
महाराष्ट्र शासनाच्या सहकार, पणन व वस्त्र उद्योग विभागाच्या दिनांक 17 मे 2006 रोजीच्या शासन निर्णयानुसार राज्य शासनाने राज्यातील शेतकऱ्यांना 6% व्याजदराने अल्प मुदत पीक कर्ज पुरवठा होण्यासाठी शासकीय अर्थसहाय्याचा निर्णय घेतलेला आहे. 'Shetkari Yojana Maharashtra'
या निर्णयानुसार केंद्र शासनाच्या धोरणानुसार बँका ज्या ठिकाणी शेतकऱ्यांना सात टक्के व्याज दराने कर्ज पुरवठा करणार आहेत त्या ठिकाणी बँकांनी सात टक्के ऐवजी शेतकऱ्यांना सहा टक्के व्याजदराने कर्ज पुरवठा करावा असे राज्य शासनाचे धोरण आहे.
यामुळे या प्रयोजनासाठी एक टक्के व्याज फरकाच्या रक्कमेचा आर्थिक भार राज्य शासनावर आहे.
सन 2006 - 2007 पासून खरीप व रब्बी हंगामामध्ये राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, राष्ट्रीयकृत बँका आणि प्रादेशिक ग्रामीण बँका व सन 2013 - 2014 पासून शेतकऱ्यांना रुपये तीन लाख पर्यंत अल्प मुदत पीक कर्ज वाटप करणाऱ्या खाजगी बँकांना या निर्णयाचा लाभ देण्यात येत आहे.
सन 2023 - 2024 या चालू आर्थिक वर्षासाठी शेतकऱ्यांना अल्पमुदत पीक कर्ज पुरवठा करण्यासाठी एक टक्के व्याजदराने अर्थसाह्य योजनेअंतर्गत निधी मंजूर करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
त्यानुसार शासनाच्या सहकार, पणन व वस्ञोद्योग विभागाच्या दिनांक 8 जानेवारी 2024 रोजीच्या शासन निर्णयानुसार राज्य शासनाने अर्थसहाय्य मंजूर केले आहे.
तर ही होती शेतकऱ्यांना अल्पमूदत पीक कर्ज पूरवठा करण्यासाठी 1 टक्के व्याजदराचे अर्थसहाय्य करण्यास राज्य शासनाने दिलेल्या मंजूरी बाबतची सविस्तर माहीती. "Shetkari Yojana Maharashtra"
सविस्तर शासन निर्णय (GR) येथे डाऊनलोड करा.
तुम्हाला हा लेख आवडला असेल अशी आशा करतो धन्यवाद.
0 Comments