राज्य शासना मार्फत अंगणवाडी कर्मचाऱ्यांना स्मार्ट मोबाईल फोनचे वाटप Smart Mobile Phone Distribution to Anganwadi employees

Smart Mobile Phone Distribution to Anganwadi employees
Smart Mobile Phone Distribution to Anganwadi employees

महाराष्ट्र राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना स्मार्ट मोबाईल फोनचे वाटप महाराष्ट्राचे मूख्यमंञी एकनाथ शिंदे आणी संयूक्त राष्ट्र संघाचे महासभेचे अध्यक्ष डेनिस फ्रान्सिस यांच्या हस्ते करण्यात आले जाणून घेऊ या विषयी सविस्तर माहीती.

राज्य शासना मार्फत अंगणवाडी कर्मचाऱ्यांना स्मार्ट मोबाईल फोनचे वाटप

महिला व बालविकास विभागाच्या वतीने अंगणवाडी सेविकांना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि संयुक्त राष्ट्र संघाचे महासभेचे अध्यक्ष डेनिस फ्रान्सिस यांच्या हस्ते स्मार्ट मोबाईल संचांचे वितरण करण्यात आले. 'Smart Mobile Phone Distribution to Anganwadi employees'

केंद्र पुरस्कृत पोषण अभियान अंतर्गत राज्य शासना मार्फत अंगणवाडी सेविकांना स्मार्ट मोबाईल संच उपलब्ध करुन दिले आहेत. 

अंगणवाडी सेविका, मुख्यसेविका, पर्यवेक्षिका तसेच तांत्रिक मनुष्यबळ यांचे करिता १ लाख १४ हजार ९७४ स्मार्ट मोबाईल फोन राज्य शासनाच्या वतीने उपलब्ध करुन दिले आहेत. 

या स्मार्ट मोबाईल फोनमध्ये MDM, POSHAN TRACKER APPLICATION या सॉफ़्टवेअरसह अन्य आवश्यक ॲप्स देण्यात आले आहेत. 

या स्मार्ट फोनमधील पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनद्वारे एकात्मिक बाल विकास सेवा योजनेची अंमलबजावणी रियल- टाईम मॉनिटरिंग पध्दतीने करण्यात येणार आहे.

मूख्यमंञी एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी आयोजित या कार्यक्रमात प्रातिनिधीक स्वरुपात अंगणवाडी सेविकांना या मोबाईल संचांचे वाटप करण्यात आले. 

या प्रसंगी मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्त रुबल अग्रवाल आदी उपस्थित होते. "Smart Mobile Phone Distribution to Anganwadi employees"

तूम्हाला हा लेख आवडला असेल अशी आशा करतो धन्यवाद.

Post a Comment

0 Comments