ST Mahamandal Iti Apprenticeship मित्रांनो आयटीआय परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.
एसटी महामंडळामध्ये शिकाऊ उमेदवार पदभरती होणार आहे.
यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने अर्ज मागविले आहेत. जाणून घेऊ या विषयी सविस्तर माहिती.
आयटीआय पास उमेदवारांसाठी एस टी महामंडळामध्ये शिकाऊ उमेदवार प्रशिक्षणार्थी पदाची भरती
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ पुणे विभागामध्ये शिकाऊ उमेदवार प्रशिक्षणार्थी या पदासाठी पद भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. 'St Mahamandal Iti Apprenticeship'
या पदभरतीसाठी इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी विभाग नियंत्रक राज्य परिवहन पुणे यांच्यातर्फे आवाहन करण्यात आले आहे.
अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत.
अर्ज करण्याची अंतिम तारीख 22 जानेवारी 2024 पदभरतीसाठी शुल्क - खुल्या प्रवर्गाकरिता रुपये 600 व मागास प्रवर्गाकरीता रुपये 300 रकमेचा डिमांड ड्राफ्ट MSRTC Fund Account पुणे या नावाने काढून तो अर्जा सोबत जोडायचा आहे.
ऑनलाइन भरलेल्या अर्जाची प्रत विभाग नियंत्रक राज्य परिवहन विभागीय कार्यालय शंकर पेठ रोड पुणे - 411037 या पत्त्यावर दिनांक 16 जानेवारी 2024 ते दिनांक 22 जानेवारी 2023 या कालावधीत समक्ष हजर राहून सकाळी 10 ते 17.30 या कार्यालयीन वेळेत शनिवार व रविवार वगळून सादर करायची आहेत.
ऑनलाईन अर्ज करण्याचे अधिकृत संकेतस्थळ - www.apprenticeshipindia.gov.in
शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या उमेदवारांना पुणे विभागामध्ये सरळ सेवा भरतीसाठी थेट अर्ज करता येईल.
शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर सदरील शिकाऊ उमेदवारास राज्य परिवहन महामंडळ पुणे विभागात सहाय्यक पदाच्या सरळ सेवा भरतीच्या वेळी सहाय्यक पदासाठी थेट अर्ज करता येईल. मात्र त्यांना महामंडळाच्या सरळ सेवेत सामावून घेण्याचे बंधन महामंडळावर राहणार नाही. St Mahamandal iti apprenticeship
शिकाऊ उमेदवार प्रशिक्षणार्थी पद भरती करिता उमेदवार हे सन 2022 - 2023 या वर्षी आयटीआय परीक्षा पास झालेले असावेत.
या पदभरती प्रक्रियेस कालमर्यादा असल्याने आयटीआय उतीर्ण झालेल्या उमेदवारांना या www.apprenticeshipindia.gov.in संकेतस्थळावर एमआयएस वेब पोर्टलवर शिकाऊ उमेदवारी बाबत रजिस्ट्रेशन करणे आवश्यक असून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ पुणे विभागाचा स्थापना रजिस्ट्रेशन क्रमांक - E10162700633 असा आहे.
हे व्यवसायिक कोर्स पूर्ण झालेल्या उमेदवारांची निवड शिकाऊ प्रशिक्षणार्थी उमेदवार म्हणून करायची आहे.
व्यवसायिक कोर्सचे नाव व आवश्यक शिकाऊ उमेदवार संख्या खालील प्रमाणे.
1) मेकॅनिकल डिझेल - 26
2) मेकॅनिकल मोटर व्हेईकल - 71
3)एअर कंडिशन - 4
4) मोटर व्हेईकल बॉडी बिल्डर शिटमेटल - 32
5) ॲटो इलेक्ट्रिशन - 25
6) वेल्डर - 20
7) पेंटर - 4
8) टर्नर - 4
9) बॅच फिटर / फिटर - 2
10) कॉम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट - 4
एकूण - 192
तुम्हाला "St Mahamandal iti apprenticeship" हा लेख आवडला असेल अशी आशा करतो धन्यवाद.
0 Comments