Task force for bamboo planting महाराष्ट्र राज्यामध्ये बांबू लागवडीस प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स स्थापन करण्यात आला आहे. जाणून घेऊ या बाबत सविस्तर माहिती.
बांबू लागवडीस प्रोत्साहन देण्यासाठी टास्क फोर्स स्थापन
वातावरणीय बदलामुळे कोरडवाहू शेती धोक्यात आली असून पिकांच्या उत्पादनावर त्याचा विपरीत परिणाम होत आहे.
विदर्भ मराठवाडा विभागातील जिल्ह्यांमध्ये वारंवार पडणारा दुष्काळ व अवकाळी पाऊस यामूळे शेतकरी संकटात सापडला आहे.
बांबू हे पीक कमी पाणी वापरणारे तसेच जास्त प्रमाणात कार्बन शोषून घेणारे असल्यामुळे पर्यावरण स्नेही असून त्याची राज्यभरात लागवड केल्यास वातावरणीय बदलाच्या संकटाला तोंड देण्याबरोबरच रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्याला उदरनिर्वाहाचे साधन उपलब्ध होणार आहे. 'Task force for bamboo planting'
राज्यातील वातावरणीय बदलाच्या संकटाला तोंड देण्यासाठी राज्यांमध्ये बांबूंची लागवड करणे महत्त्वाचे असून ही बांबू लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी व बांबू लागवडीचा वेळोवेळी आढावा घेऊन मार्गदर्शन करण्यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स गठीत करण्यात आला आहे.
बांबू लागवडीस प्रोत्साहन देण्यासाठी मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली 18 सदस्यांच्या टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे.
खालील प्रमाणे 18 सदस्यांच्या टास्कफोर्सची स्थापना मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली आहे. Task force for bamboo planting
१) मा.मुख्यमंत्री - अध्यक्ष
2) मा.उपमुख्यमंत्री - सहअध्यक्ष
3) मा. उपमुख्यमंत्री तथा वित्त नियोजन मंत्री - सहअध्यक्ष
४) मा. महसूल मंत्री - सदस्य
५) मा. मंत्री वने - सदस्य
६) मा.मंत्री ग्रामविकास - सदस्य
७) मा.मंत्री कृषी - सदस्य
८) मा. मंत्री आदिवासी विकास - सदस्य
९) मा.मंत्री जलसंधारण - सदस्य
१०) मा.मंत्री रोहियो - सदस्य
११) पाशा पटेल - अध्यक्ष राज्य कृषी मूल्य आयोग
१२) प्रधान सचिव महसूल व वन विभाग मंत्रालय मुंबई
१३)प्रधान सचिव वने महसूल व वन विभाग मंत्रालय मुंबई
१५) प्रधान सचिव ग्रामविकास विभाग मंत्रालय मुंबई
१६) प्रधान सचिव पर्यावरण व वातावरण बदल विभाग मंत्रालय मुंबई
१७) प्रधान सचिव जलसंधारण विभाग मंत्रालय मुंबई
१८) प्रधान सचिव आदिवासी विकास विभाग मंत्रालय मुंबई
आशा प्रकारे या 18 सदस्यांच्या टास्क फोर्सची स्थापना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्यांमध्ये बांबू लागवडीस प्रोत्साहन देण्यासाठी करण्यात आली आहे.
किमान तीन महिन्यातून एकदा होणार टास्क फोर्सची बैठक
महाराष्ट्र राज्यातील बांबू लागवडीस प्रोत्साहन देण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या टास्क फोर्सच्या बैठकीसाठी निमंत्रित म्हणून आवश्यकतेनुसार विविध शासकीय संस्था कंपन्या यांच्या प्रतिनिधींना तसेच तज्ञ व्यक्तींना बोलविण्यात येणार आहे.
तसेच या टास्क फोर्सची बैठक तीन महिन्यातून किमान एकदा आयोजित करण्यात यावी अशी तरतूद करण्यात आली आहे.
राज्यामध्ये बांबू लागवडीस प्रोत्साहन देण्याबाबत टास्क फोर्स विचार करील व एक कालबद्ध कार्यक्रम तयार करून त्याची संबंधित यंत्रणे मार्फत अंमलबजावणी करून घेईल असा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे.
अशा प्रकारे राज्यामध्ये बांबू लागवडीस प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
याबाबतचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाने दिनांक 3 जानेवारी 2024 रोजी प्रसिद्ध केला आहे.
तुम्हाला "Task force for bamboo planting" हा लेख आवडला असेल अशी आशा करतो धन्यवाद.
0 Comments