नॅकच्या धर्तीवर मूल्यांकन प्रणाली आणण्याचा शासनाचा विचार असल्याचे प्रतिपादन उपमूख्यमंञी अजित पवार यांनी रावेत येथील अराईज इंटरनॅशनल स्कुलच्या नूतन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी केले. जाणून घेऊ या विषयी सविस्तर माहीती.
नॅकच्या धर्तीवर मूल्यांकन प्रणाली आणण्याचा शासनाचा विचार उपमूख्यमंञी अजित पवार यांचे प्रतिपादन
रावेत येथील अराईज इंटरनॅशनल स्कुलच्या नूतन इमारतीच्या उद्घानाचा कार्यक्रम महाराष्ट्र राज्याचे उपमूख्यमंञी अजित पवार यांच्या उपस्थीतीत पार पडला. 'Assessment system on NAC lines'
शिक्षण अन्यायाविरुद्ध लढण्याचं बळ देतं, शिक्षणामुळे श्रमाचं मूल्य आपल्याला कळतं. प्रतिभावंत आणि चारित्र्यसंपन्न व्यक्तीमत्व घडवण्यासाठी शिक्षण महत्वाचं आहे. शिक्षणाचं महत्व लक्षात घेता शिक्षण संस्थांमधील शैक्षणिक वातावरण अधिक चांगलं करण्यासाठी नॅकच्या धर्तीवर मूल्यांकन प्रणाली आणण्याचा शासनाचा विचार आहे, असे प्रतिपादन यावेळी उपमूख्यमंञी अजित पवार यांनी केले.
पूढे बोलताना उपमूख्यमंञी अजित पवार म्हणाले की उद्योगनगरी आणि कामगार नगरी पिंपरी चिंचवडचा चेहरामोहरा बदलण्याचा प्रयत्न केल्याने या परिसराचं सर्व सुविधांनी युक्त शहरात रुपांतर झालं आहे.
पिंपरी चिंचवड शहराला आधुनिक शहर बनवण्यासाठी उत्तम विकासयोजना राबवण्याचा प्रयत्न आहे.
विकसित शहरात उत्तम शैक्षणिक सुविधा असणं गरजेचं आहे. शहरात जेव्हा चांगल्या शैक्षणिक सुविधा दिल्या जातात तेव्हा पालक आपल्या पाल्याला शिक्षणासाठी अशा ठिकाणी पाठवतात.
शिक्षण संस्थांमधून इंग्रजीतून ज्ञान देताना आपल्या मराठी भाषेचं ही ज्ञान असणं आवश्यक आहे. विद्यादान हे उदात्त भावनेनं केल्यास आणि उत्कृष्टतेचा ध्यास धरल्यास चांगले विद्यार्थी घडवता येतील.
गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत कौशल्ययुक्त शिक्षण देणं आवश्यक आहे. त्यादृष्टीनं नव्या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी शिक्षण संस्थांनी करावी, असे आवाहन यानिमित्ताने उपमूख्यमंञी यांनी केले.
शालेय विद्यार्थ्यांना मराठीसोबत इंग्रजीचं ही ज्ञान असणं गरजेचं
महाराष्ट्रात शिक्षण घेत असलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला आपली मातृभाषा म्हणून मराठीचं ज्ञान असलंच पाहिजे. मराठी भाषा पिढ्यानपिढ्या टिकली पाहिजे. आपल्या मातृभाषेचं संवर्धन करण्यासाठी प्रत्येकानं प्रयत्न करणं गरजेचं आहे. शासनही यादृष्टीनं विविध स्तरावर प्रयत्न करीत आहे.
शालेय विद्यार्थ्यांना मराठीसोबतच इंग्रजीचं ही ज्ञान असणं गरजेचं आहे असे मत उपमूख्यमंञी अजित पवार यांनी व्यक्त करून आधूनिक यूगात पूढे जाण्यासाठी इंग्रजीचे महत्व पटवून दिले.
पूढे बोलताना उपमूख्यमंञी म्हणाले की माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी १९८३ मध्ये सुरू केलेल्या माध्यमिक विद्यालयाचं रुपांतर आज वटवृक्षात झालं आहे. ज्ञान, विज्ञानाच्या माध्यमातून तेजस्वी विद्यार्थी घडवण्याचं कार्य या संस्थेद्वारे होत आहे. शाळेच्या विद्यार्थ्यांनी अनेक स्पर्धांमध्ये यश मिळवलं आहे. संस्थेचे विद्यार्थी विविध क्षेत्रात मोठ्या पदावर कार्यरत आहेत.
अराईज इंटरनॅशन स्कूलचे कार्य दिशादर्शक आणि प्रेरणादायी आहे. असे मत यावेळी उपमूख्यमंञी अजित पवार यांनी व्यक्त केले. "Assessment system on NAC lines'
तूम्हाला ही बातमी आवडली असेल अशी आशा करतो धन्यवाद.
0 Comments