राज्यात दोन लाख रोजगार,स्वयंरोजगार निर्माण करण्यात येणार, जेष्ठ नागरीकांनाही मिळणार महत्वाचे लाभ मंञीमंडळ बैठकीत निर्णय

Cabinet Meeting Decisions Maharashtra
Cabinet Meeting Decisions Maharashtra 

Cabinet Meeting Decisions Maharashtra महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज दिनांक 5 फेब्रुवारी 2024 रोजी पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. 
सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या या मंत्रिमंडळ बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.

राज्यात दोन लाख रोजगार,स्वयंरोजगार निर्माण करणार मंञीमंडळ बैठकीत निर्णय

मंत्रिमंडळ बैठकी मध्ये खालील महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहे. 
मंञीमंडळ बैठकीमधील संक्षिप्त निर्णय : 'Cabinet Meeting Decisions Maharashtra '

मुंबईकरांना यावर्षी सुद्धा मालमत्ता कर वाढ नाही.

राज्यात नमो महारोजगार मेळावे आयोजित करणार. २ लाख रोजगार, स्वयंरोजगार निर्माण करणार.

ज्येष्ठ नागरिकांसाठी शासन संवेदनशील. मुख्यमंत्री वयोश्री योजनेतून ६५ वर्षावरील नागरिकांना लाभ देणार.

राज्यातील सर्व पालिकांमध्ये आता नगरोत्थान महाभियान राबवणार. पायाभूत सुविधा बळकट करणार.

उत्पन्नवाढीसाठी शेतकऱ्यांना बांबू लागवडीसाठी अनुदान देणार.

मधाचे गाव योजना संपूर्ण राज्यात राबवणार. मध उद्योगाला बळकटी देण्यात येणार.

पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी जुन्नर तालुक्यात बिबट सफारी.

बंजारा, लमाण समाजाच्या तांड्यांचा विकास करणार. मूलभूत सुविधा देणार.

शिर्डी विमानतळाचा अधिक विस्तार, नवीन इमारत उभारणी.

धारावी पुनर्वसनासाठी केंद्राची मिठागर जागा मागणार

सेवानिवृत्त न्यायिक अधिकाऱ्यांना सुधारित भत्ते.

स्व. बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन सांगोला प्रकल्पास सुधारित मान्यता.

बिगर कृषी सहकारी संस्थांना अर्थसहाय्य. पतसंस्थांना मजबूत करणार.

कोंढाणे लघु प्रकल्पाच्या कामास जादा खर्चास मान्यता.

तिवरे लघु पाटबंधारे योजनेची पुनर्स्थापना करणार.

नांदेडच्या गुरुद्वारासाठी तख्त सचखंड श्री हजूर साहिब गुरुद्धारा अधिनियम.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची प्रतिमा उंचावण्यासाठी जनसंपर्क अधिकारी नेमणार

कृषी विद्यापीठातील शिक्षकांच्या सेवानिवृत्तीचे वय आता साठ वर्ष

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सार्वजनिक बांधकामचे नवीन मंडळ कार्यालय. 

गोसेवा आयोगासाठी सहआयुक्त पशुसंवर्धन पद. "Cabinet Meeting Decisions Maharashtra" 

याप्रमाणे हे महत्वाचे निर्णय आजच्या मंञीमंडळ बैठकीत घेण्यात आले आहेत.

तूम्हाला हा लेख आवडला असेल अशी आशा करतो धन्यवाद. 

Post a Comment

0 Comments