बीड जिल्ह्याकरीता सन 2024 साठी बीडचे जिल्हाधिकारी यांनी तीन स्थानिक सूट्या दिनांक 13 फेब्रुवारी 2024 रोजीच्या अधिसूचनेनूसार जाहीर केल्या आहेत. जाणून घेऊ या विषयी सविस्तर माहीती.
बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी जाहीर केल्या तीन सूट्या Collector declared Holiday
जिल्हाधिकारी यांना त्यांच्या कार्यक्षेञातील जिल्ह्यामध्ये स्थानिक सण, उत्सव,जञा, इत्यादीसाठी एका कँलेडर वर्षात तीन स्थानिक सूट्टी जाहीर करण्याचा अधिकार आहे.
या बाबतचे शासन निर्णय (GR) दिनांक 6/8/1958 व दिनांक 29/6/1982 रोजी प्रसिद्ध झालेले आहे.
यानूसार या अधिकाराचा वापर करून बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्रीमती दिपा मूधोळ मूंडे यांनी बीड जिल्ह्याकरीता सन 2024 या चालू वर्षासाठी तीन स्थानिक सूट्या जाहीर केल्या आहेत.
खालीलप्रमाणे तीन स्थानिक सूट्टी जिल्हाधिकारी बीड यांनी जाहीर केल्या आहेत.
१) सोमवार दिनांक 19/8/2024 तिसरा श्रावण सोमवार, रक्षाबंधन.
२) बूधवार दिनांक 11/9/2024 जेष्ठ गौरी पूजन.
3) गूरूवार दिनांक 31/10/2024 नरक चतूर्दशी.
या प्रमाणे वरील तीन सण, उत्सवासाठी स्थानिक सूट्या जाहीर करण्यात आल्या आहेत.
वरील तीन स्थानिक सूट्या बीड जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालये, जिल्हा परीषदेच्या कक्षेतील कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्थेची कार्यालये, जिल्ह्यातील शासकीय कोषागारे, महामंडळाची कार्यालये, व इतर सर्व खाजगी शैक्षणिक संस्था यांना लागू असतील.
दिनांक 13 फेब्रुवारी 2024 रोजी निगर्मित करण्यात आलेली स्थानिक सूट्टी बाबतची अधिसूचना बीड जिल्ह्यातील दिवाणी व फौजदारी न्यायालयांना व केंद्र शासनाच्या कार्यालयांना तसेच बँकाना लागू राहणार नाही.
अशाप्रकारे या तीन स्थानिक सूट्टी बीड जिल्ह्याकरीता सन 2024 साठी जाहीर करण्यात आल्या आहेत.
Collector Declared Holiday अधिसूचना
तूम्हाला हा लेख आवडला असेल अशी आशा करतो धन्यवाद.
0 Comments