दिव्यांग नागरिकांना होणार ई शॉप्स दुकानांचे वाटप दिव्यांग वित्त व विकास महामंडळाच्या बैठकीत निर्णय Divyang Nagrikasathi E Shops

Divyang Nagrikasathi E Shops
Divyang Nagrikasathi E Shops

दिव्यांग नागरिकांना ई शॉप्स दुकानाचे वाटप होणार आहे या बाबतचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या दिव्यांग वित्त व विकास महामंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आला आहे. 

या निर्णया सोबतच दिव्यांग नागरीकांसाठी इतरही महत्त्वाचे विविध निर्णय घेण्यात आलेले आहेत. जाणून घेऊ या बाबत सविस्तर माहिती.

दिव्यांग नागरिकांना होणार ई शॉप्स दुकानांचे वाटप दिव्यांग वित्त व विकास महामंडळाच्या बैठकीत निर्णय Divyang Nagrikasathi E Shops

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली दिव्यांग वित्त व विकास महामंडळाच्या संचालक मंडळाची बैठक दिनांक 23 फेब्रुवारी 2024 रोजी सह्याद्री अतिथी गृह मुंबई येथे पार पडली. 

या बैठकीमध्ये दिव्यांग नागरिकांसाठी विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. Divyang Nagrikasathi E Shops

दिव्यांग व्यक्तीने स्वावलंबी व्हावे यासाठी 798 हरित ऊर्जेवर चालणाऱ्या पर्यावरण स्नेही वाहनावरील दुकाने ई शॉप्सचे वाटप दिव्यांग व्यक्तींना करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला असून ही दूकाने दिव्यांग व्यक्तींना वाटप करण्यास व त्यासाठी येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे.

यानूसार आता दिव्यांग व्यक्तीना हरीत उर्जेवर चालणाऱ्या वाहनावरील दूकानाचे (ई शॉप्स) वाटप होणार आहे.

दिव्यांगाच्या रोजगार व स्वयंरोजगार साठी सायन्स अँड टेक्नॉलॉजी पुणे यांच्यासोबत करार करण्यास मान्यता.

पुणे येथील सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्क यांच्याशी करार करण्यास दिव्यांग वित्त व विकास महामंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. Science and technology park pune

या करारामुळे दिव्यांगाच्या रोजगार व स्वयंरोजगारासाठी कौशल्य विकास प्रशिक्षणाची व्यवस्था केली जाणार आहे. यातून दिव्यांगा मधील स्टार्ट अप्स उद्योजकता विकास यांना प्रोत्साहन मिळणार आहे.

नमो दिव्यांग शक्ती अभियान अंतर्गत राज्यात 73 दिव्यांग पुनर्वसन केंद्र स्थापन करण्यात येणार.

नमो दिव्यांग अकरा कलमी कार्यक्रमात नमो दिव्यांग शक्ती अभियान अंतर्गत महाराष्ट्र राज्यामध्ये 73 दिव्यांग पुनर्वसन केंद्र उभारण्याचा संकल्प करण्यात आलेला आहे.

या संकल्पानुसार आता राज्यात 73 पुनर्वसन केंद्र स्थापन करण्यात येणार आहे.  Divyang punarvasan kendra

या पुनर्वसन केंद्रात दिव्यांगांना सक्षम करण्यासाठी विविध साधनांची उपलब्धता असेल तसेच चिकित्सा व उपचार यासह आदी आवश्यक गोष्टींचा समावेश राहील या दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना बैठकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत.

दिव्यांगाचे अत्याधुनिक पद्धतीने सर्वेक्षण करावे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

दिव्यांग व्यक्तींचे जिल्हानिहाय 100% सर्वेक्षण करण्यात येत आहे. हे काम अत्याधुनिक पद्धतीने करण्यात यावे या बाबतची सर्व माहिती एकाच ठिकाणी एकत्रित होईल अशा प्रकारे योग्य ते नियोजन करावे त्या संदर्भात आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिव्यांग वित्त व विकास महामंडळाच्या बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.

दिव्यांग वित्त व विकास महामंडळाच्या या बैठकीस दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव सुमंत भांगे, आयुक्त प्रवीण पुरी, महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अभय करगूटकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. 

तुम्हाला Divyang Nagrikasathi e Shops हा लेख आवडला असेल अशी आशा करतो धन्यवाद.

Post a Comment

0 Comments