मूख्यमंञी एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वातानूकूलीत ई बसेसचे लोकार्पण संपन्न झाले असून पर्यावरणपूरक व आरामदायी असलेल्या एसटी महामंडाळाच्या या बसेस प्रवाशांच्या सेवेत दाखल होत आहेत. जाणून घेऊ या विषयी सविस्तर माहीती.
प्रवाशांच्या सेवेत येणार एसटी महामंडळाच्या वातानुकूलित इलेक्ट्रिक बसेस
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रदूषणमुक्त, पर्यावरणपूरक आणि वातानुकुलित इलेक्ट्रिक बसगाड्यांचे लोकार्पण आज दिनांक 13 फेब्रुवारी 2024 रोजी करण्यात आले. 'Electric Buses Inauguration'
एसटी बस ही राज्याची जीवनवाहिनी असून या एसटीच्या चालक-वाहकांचे गावकऱ्यांशी कायमचे ऋणानुबंधाचे नाते निर्माण झाले आहे. ग्रामीण भागाच्या विकासात एसटीचे मोठे योगदान असून काळानुरूप एसटीमध्ये अनेक बदल झाले असून आता एसटीच्या ताफ्यात ५१५० संपूर्णपणे वातानुकूलित ई-बसेस दाखल होत आहेत. या नवीन बसमुळे प्रवाशांना आरामदायक आणि पर्यावरणपूरक प्रवास करता येणे शक्य होणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
एसटी महामंडळाने ५१५० वातानुकूलित ई-बसेस घेण्याचा धाडसी निर्णय घेतला असून त्यासाठी राज्यभरात १७३ पेक्षा जास्त बसस्थानकांवर ई-बस चार्जिंग स्टेशन्सची निर्मिती करण्यात येत आहे.
या ३४ आसनी, वातानुकूलित ई-बसेस बोरिवली-ठाणे-नाशिक या मार्गावर धावणार असून याचा तिकीट दर सध्याच्या हिरकणी (एशियाड) बसेस सारखाच असणार आहे.
विशेष म्हणजे या बसमध्ये महिलांना ५० टक्के, ६५ ते ७५ वर्षांपर्यंतच्या ज्येष्ठ नागरिकांना ५० टक्के तर अमृत ज्येष्ठ नागरिकांना १०० टक्के तिकीट दरात सवलत देण्यात येत आहे.
वातानूकूलीत ईलेक्ट्रीक एसटी बसेसची वैशिष्टये
- 5150 वातानूकूलीत ई - बसेस प्रवाशांच्या सेवेत दाखल होत आहेत.
- बसेस चार्जिंग करण्यासाठी राज्यभरात 173 पेक्षा जास्त बसस्थानकावर ई - बस चार्जिंग स्टेशनची निर्मिती करण्यात येत आहे.
- या ईलेक्ट्रीक बसेस संपूर्णपणे वातानूकूलीत (AC) आणी आरामदायक आहेत.
- या आरामदायक बसेसची आसनक्षमता 34 आहे.
- या बसमध्ये महीलांना 50 टक्के, 65 ते 75 वर्षे वयापर्यंतच्या जेष्ठ नागरीकांना 50 टक्के, तर 75 वर्षापूढील जेष्ठ नागरीकांना मोफत प्रवासाचा लाभ उपलब्ध आहे.
- या ई - बसेस बोरीवली - ठाणे - नाशिक मार्गावर धावणार आहेत.
ठाणे शहरातील खोपट बसस्थानकात आयोजित या कार्यक्रमास आमदार प्रताप सरनाईक, माजी आमदार रवींद्र फाटक, परिवहन विभागाचे प्रधान सचिव पराग जैन, एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव पुसेकर आदी मान्यवर उपस्थित होते. "Electric Buses Inauguration"
तूम्हाला हा लेख आवडला असेल अशी आशा करतो धन्यवाद.
0 Comments