गोंदीया शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या नवीन वास्तूचे भूमीपूजन संपन्न Gondia Medical College New Building inauguration

Gondia Medical College New Building inauguration
Gondia Medical College New Building inauguration

महाराष्ट्र राज्यातील गोंदीया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या नवीन वास्तूचे भूमीपूजन संपन्न झाले आहे. जाणून घेऊ या बाबत सविस्तर माहीती.

गोंदिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या नव्या वास्तूचे भूमिपूजन उपराष्ट्रपती यांच्या हस्ते संपन्न

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते आणि राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत दिनांक 11 फेब्रुवारी 2024 रोजी गोंदिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या नव्या वास्तूचे भूमिपूजन करण्यात आले. 'Gondia Medical College New Building inauguration'

देशाच्या अमृत काळात २०४७ पर्यंत विकसित भारताच्या उभारणीचे स्वप्न साकारताना सर्वांचे आरोग्य व्यवस्थित राहिले तरच देश परिपूर्णतेने सामर्थ्यशाली होऊ शकेल. यासाठी सर्वांनी आपली जीवनचर्या योग्य पद्धतीने राखून प्रकृतीची काळजी घ्यावी तसेच  देशाचा अमूल्य सांस्कृतिक वारसा असलेल्या आयुर्वेद जीवनपद्धतीची जोपासना करावी, असे आवाहन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केले.

महाराष्ट्रातील वैद्यकीय शिक्षण तसेच सार्वजनिक आरोग्य विषयक सुविधांबाबत समाधान व्यक्त करून उपराष्ट्रपती म्हणाले, आयुष्मान भारत योजनेच्या माध्यमातून देशातील नागरिकांना जगातील सर्वात मोठे आरोग्यविषयक सुरक्षा कवच देण्यात आले आहे. नागरिकांना उपचारासाठी केवळ आर्थिक मदत नव्हे तर या माध्यमातून आरोग्यविषयक संपूर्ण सेवा अत्यंत प्रभावीपणे उपलब्ध करून देण्यात येत आहेत. वेद हा देशाचा मोठा सांस्कृतिक वारसा असून त्यात मोलाचे आरोग्यविषयक मार्गदर्शन आहे. उत्तम आरोग्याची जपणूक करून आपण नव्या भारताच्या निर्मितीत योगदान देऊ शकतो, असे त्यांनी यावेळी सांगितले.

गोंदिया येथे वैद्यकीय महाविद्यालयासाठी नव्या स्वतंत्र इमारतीची उभारणी व्हावी ही जिल्ह्यातील नागरिकांची आग्रही मागणी होती.  नव्या वास्तूचे भूमिपूजन उपराष्ट्रपतींच्या हस्ते करण्यात आले असून या माध्यमातून जिल्ह्यातील नागरिकांची मागणी पूर्ण करण्यात आलेली आहे. त्यामुळे नागरिकांना आरोग्याच्या उत्तम, दर्जेदार सुविधा मिळण्याचा मार्ग प्रशस्त होणार आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. 

राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यात महाराष्ट्र अग्रेसर आहे. शासकीय रुग्णालयात सर्व सेवा मोफत देण्यात येणार आहेत. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत नागरिकांना दीड लाखांवरुन आता ५ लाखांपर्यंत मोफत उपचार देण्यात येणार आहेत. राज्यातील सर्वसामान्य जनतेला न्याय देणे हे आपले कर्तव्य आहे. हे सरकार लोकाभिमुख असून शेतकऱ्यांच्या हिताचे आहे. राज्य शासनाने धानाला प्रथमच २० हजार रुपये बोनस दिला असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 

महिलांच्या सशक्तीकरणा अंतर्गत राज्यातील ४ कोटी महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. ‘माता सुरक्षीत तर देश सुरक्षीत’ असे धोरण राबविण्यात येत आहे. लोकांच्या हाताला काम मिळाले पाहिजे यासाठी गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात मग्रारोहयो अंतर्गत कामे सुरु आहेत. ‘स्व. बाळासाहेब ठाकरे समृध्दी महामार्ग’ आता गोंदिया पर्यंत पोहोचणार आहे, असे मूख्यमंञी यावेळी म्हणाले.

या प्रसंगी पालकमंत्री धर्मरावबाबा आत्राम, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, खासदार सर्वश्री प्रफुल्ल पटेल, सुनील मेंढे, डॉ. सी. एम. रमेश, डॉ. श्रीकांत शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. "Gondia Medical College New Building inauguration"

तूम्हाला ही बातमी आवडली असेल अशी आशा करतो धन्यवाद. 

Post a Comment

0 Comments