राज्यातील ग्रामरोजगार सेवकांच्या विविध मागण्या बाबत मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत चर्चा करून सकारात्मक निर्णय घेण्यात आले आहेत. जाणून घेऊ या बाबत सविस्तर माहिती.
ग्रामरोजगार सेवकांच्या विविध मागण्या बाबत मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली सकारात्मक बैठक संपन्न
महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेचे अभिलेख आणि नोंदवही आदी कामांसाठी ग्रामसेवकांना मदतनीस म्हणून ग्रामरोजगार सेवकांच्या सेवा घेण्यात आल्या आहेत. 'meeting for gram Rojgar Sevak demands'
राज्यात 26600 ग्राम रोजगार सेवक ग्रामपंचायत स्तरावर कार्यरत असून त्यांना कामाच्या प्रमाणानुसार मानधन दिले जाते.
राज्यातील ग्रामरोजगार सेवकांच्या विविध मागण्या बाबत मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीमध्ये विविध मुद्द्यावर सविस्तर चर्चा करण्यात येऊन सकारात्मक निर्णय घेण्यात आलेले आहेत.
राज्यातील ग्राम रोजगार सेवकांना विमा कवच प्राप्त होणार असून ग्राम रोजगार सेवकांचे गट विमा काढण्याचे निर्देश मुख्यमंत्री यांनी दिले आहेत.
तसेच ग्रामरोजगार सेवकांच्या विविध मागण्या बाबत सुद्धा बैठकीमध्ये सविस्तर सकारात्मक चर्चा करण्यात आली.
ग्रामरोजगार सेवकांना सध्या विमा कवच नसल्याने अपघात किंवा इतर कारणांमुळे मृत्यू झाल्यास कुटुंबियाचे हाल होतात ही बाब मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आल्यावर ग्राम रोजगार सेवकांचा गट विमा काढण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
तसेच कोरोना काळात मृत्यू झालेल्या ग्राम रोजगार सेवकांची माहिती संकलित करण्याच्या सूचनाही मुख्यमंञी एकनाथ शिंदे यांनी दिल्या.
त्याचप्रमाणे ग्राम रोजगार सेवकांच्या पदनामात बदल करून ते ग्रामरोजगार सहाय्यक करण्यात येईल असे मुख्यमंत्री यांनी जाहीर केले.
ग्राम रोजगार सेवकांच्या मानधनात वाढ करण्यासाठी यासंदर्भात इतर राज्यांनी घेतलेल्या निर्णयाची माहिती घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री यांनी दिले.
ग्रामरोजगार सेवकांच्या या मुद्द्याबाबत घेण्यात आले निर्णय
1) ग्रामरोजगार सेवकांचा गट विमा काढण्याचे निर्देश मुख्यमंत्री यांनी दिले.
2) कोरोना काळात मृत्यू झालेल्या ग्राम रोजगार सेवकांची माहिती संकलित करण्याच्या सूचना मुख्यमंत्री यांनी दिल्या.
3) ग्रामरोजगार सेवकांच्या पदनामात बदल करून ते ग्रामरोजगार सहाय्यक करण्यात येईल असे मुख्यमंत्री यांनी जाहीर केले.
4) ग्राम रोजगार सेवकांच्या मानधनात वाढ करण्यासाठी या संदर्भात इतर राज्यांनी घेतलेल्या निर्णयाची माहिती घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
याप्रमाणे वरील महत्त्वाच्या मुद्द्याबाबत सकारात्मक निर्णय मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आले. meeting for gram Rojgar Sevak demands
या बैठकीला मृदा व जलसंधारण मंत्री संजय राठोड, रोजगार हमी योजना विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, ग्रामविकास विभागाचे सचिव एकनाथ डवले, रोहयो मिशनचे महासंचालक नंदकूमार तसेच ग्रामरोजगार सेवक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. "Meeting for Gramrojgar Sevak Demands"
तुम्हाला हा लेख आवडला असेल अशी आशा करतो धन्यवाद.
0 Comments