Indian Forest Services Exam 2024 (Upsc) केंद्रीय लोकसेवा आयोग यांच्या वनसेवा परीक्षा मार्फत विविध 150 जागासाठी भरती होणार आहे.
या बाबतची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे जाणून घेऊ याबाबत सविस्तर माहिती.
भारतीय वन सेवा परीक्षा - 2024 Indian Forest Services Exam 2024
केंद्रीय लोकसेवा आयोग यूपीएससी अंतर्गत वन सेवा परीक्षा मार्फत विविध पदांच्या 150 जागा भरण्यासाठी पात्रता धारक असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
परीक्षेचे नाव :- भारतीय वनसेवा परीक्षा 2024
एकूण जागा - 150
अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक :- दिनांक 5 मार्च 2024 पर्यंत संध्याकाळी 6 वाजेपर्यंत अर्ज करण्याची मूदत आहे.
अर्ज करण्याची पद्धत :- अर्ज ऑनलाईन पद्धतीने करणे आवश्यक आहे.
परीक्षेची पद्धत :- वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची परीक्षा असून चुकीच्या उत्तरासाठी गुण कपात करण्यात येतील.
परीक्षेमध्ये मोबाईल फोन वापरावर प्रतिबंध :- परीक्षा चालू असताना परीक्षा हॉलमध्ये मोबाईल फोन, इलेक्ट्रॉनिक साहित्य, प्रोग्रॅमेबल डिव्हाईस, पेन ड्राईव्ह, स्मार्टवॉच, इत्यादी साहित्याच्या वापरावर बंदी असून हे साहित्य परीक्षा हॉलमध्ये नेण्यास बंदी आहे.
वयोमर्यादा :- किमान 21 वर्ष, कमाल 32 वर्ष.
पाञता :- भारतीय वन सेवा परीक्षेकरिता अर्ज करण्यासाठी उमेदवार हा शासनमान्य विद्यापीठातून ॲनिमल हजबंडरी, व्हेटर्नरी सायन्स, बॉटनी, केमिस्ट्री, झूलॉजी,जिओलॉजी,मॅथेमॅटिक्स,फिजिक्स, Statistics, यापैकी विषयासह पदवीधर असावा किंवा ॲग्रीकल्चर, फॉरेस्ट्री पदवीधारक किंवा इंजिनिअरिंग पदवीधारक असावा.
परीक्षा शूल्क :- रूपये 100 परीक्षा शूल्क असून SC, ST, PWBD, उमेदवारांना परीक्षा शूल्कामध्ये सूट आहे.
0 Comments