महानगरपालिका ठाणे आरोग्य विभागामध्ये विविध पदाच्या 202 जागा Job vacancy thane mahanagar palika

Job Vacancy in Thane Mahanagar Palika
Job Vacancy in Thane Mahanagar Palika

Job vacancy thane mahanagar palika महानगरपालिका ठाणे येथे आरोग्य विभागांतर्गत विविध पदांच्या 202 जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. जाणून घेऊ या बाबत सविस्तर माहिती.

महानगरपालिका ठाणे आरोग्य विभागामध्ये विविध पदाच्या 202 जागा Job vacancy thane mahanagar palika

ठाणे महानगरपालिका मध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियान 15 व्या वित्त आयोग अंतर्गत वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, व बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी पदाकरिता भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असून याबाबतची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. Job vacancy thane mahanagar palika

अर्ज सादर करण्याचा पत्ता व दिनांक :-
अर्ज सादर करण्याचा पत्ता - ठाणे महानगरपालिका भवन सेनानी जनरल अरुण कुमार वैद्य मार्ग चंदनवाडी पांच पाखडी ठाणे (प) - 400602 या पत्त्यावर दिनांक 23/2/2024 ते 29/2/2024 पर्यंत इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.

वयोमर्यादा :- एमबीबीएस विशेषज्ञ आणि अतिविशिष्ट विशेषज्ञ यांची वयोमर्यादा 70 वर्षे पर्यंत आहे.

बीएएमएस - यांची वयोमर्यादा खुला प्रवर्गासाठी 38 व राखीव प्रवर्गासाठी 43 वर्षे आहे.

बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी :- खूला प्रवर्ग 18 ते 38 वर्षे तर राखीव प्रवर्गासाठी वयोमर्यादा पाच वर्षापर्यंत शिथिल आहे.

परिचारिका - खुला प्रवर्गासाठी वयोमर्यादा 18 ते 38 वर्षे राखीव प्रवर्गासाठी वयोमर्यादा पाच वर्षापर्यंत शिथील करण्यात येईल.

शैक्षणिक अहर्ता, पात्रता :-

वैद्यकीय अधिकारी एकूण पदसंख्या - 67 असून एमबीबीएस पदवी उत्तीर्ण झालेले असावेत. एमबीबीएस उमेदवार उपलब्ध न झाल्यास बीएएमएस पदवी उत्तीर्ण उमेदवारांचा भरती प्रक्रियेसाठी विचार केला जाईल. तसेच महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेतील नोंदणी प्रमाणपत्र व खाजगी किंवा शासकीय रुग्णालयातील कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे.

परिचारिका महिला - एकूण पदसंख्या - 60  शैक्षणिक अर्हता - GNM किंवा BSC Nursing.

परीचारीका पूरूष - एकूण पदसंख्या - 7 शैक्षणिक अर्हता - GNM किंवा BSC Nursing.

बहूउद्देशिय आरोग्य कर्मचारी - एकूण पदसंख्या - 68 शैक्षणिक अर्हता - बारावी विज्ञान + Basic Training Course किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स उत्तीर्ण.

संगणक अहर्ता - एमएस - सीआयटी प्रमाणपत्र धारण करीत असल्याचा तपशील नमूद करावा.

अर्ज शूल्क - 

खुल्या प्रवर्गा करिता रुपये 150 व राखीव प्रवर्गाकरिता रुपये 100 रकमेचा धनाकर्ष (डीडी) अर्ज शूल्क असून कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेचा डिमांड ड्राफ्ट integrated health and family welfare society thane या नावे काढून अर्जासोबत जोडावा.

अर्ज करण्याची पद्धत :-  

सर्व इच्छुक उमेदवारांनी गुगल लिंकवर ऑनलाईन गुगल फॉर्म मध्येच अर्ज विहित कालावधीत भरणे आवश्यक आहे. अर्ज भरण्यासाठी गुगल फॉर्म लिंक जाहीराती मध्ये नमूद आहे सविस्तर जाहीरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा.  

पूर्ण भरलेल्या गुगल फॉर्मची स्वसाक्षांकीत प्रत व सर्व कागदपत्रे ठाणे महानगरपालिका भवन सरसेनानी जनरल अरुण कुमार वैद्य मार्ग चंदनवाडी पांच पाखडी ठाणे (प)- 400602 येथे सुट्टीचे दिवस वगळून प्रत्यक्ष अथवा टपाल कुरिअरद्वारे सादर करावेत. Job vacancy thane mahanagar palika

तूम्हाला हा लेख आवडला असेल अशी आशा करतो धन्यवाद.

Post a Comment

0 Comments