महापारेषण कंपनीमध्ये विविध पदाच्या 444 जागा Job Vacancy in Mahapareshan Company

Mahapareshan Company Job Vacancy
Mahapareshan Company Job Vacancy

Mahapareshan Company Job Vacancy महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीमध्ये 444 पदांची भरती निघाली आहे. या बाबतची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. 

या जाहिरातीनुसार कंपनीने महापारेषण कंपनी मधील अनुभवी व विहित शैक्षणिक अहर्ता धारण करणारे कर्मचारी, उमेदवारांकडून विहीत नमून्यातील अर्ज ऑनलाईन पद्धतीने मागविले आहेत. जाणून घेऊ याबाबत सविस्तर माहिती. 

महापारेषण कंपनीमध्ये विविध पदाच्या 444 जागा Job Vacancy in Mahapareshan Company

1) महापारेषण कंपनीमध्ये वरिष्ठ तंत्रज्ञ (पारेषण प्रणाली) या पदाच्या एकूण 98 जागा आहेत. 'Job Vacancy in Mahapareshan Company'

2) तंत्रज्ञ 1 (पारेषण प्रणाली) या पदाच्या एकूण 137 जागा आहेत.

3) तंत्रज्ञ 2 (पारेषण प्रणाली) या पदाच्या एकूण 209 जागा आहेत. 

वयोमर्यादा 
पात्र कर्मचाऱ्यांसाठी कमाल वयोमर्यादा 57 वर्ष आहे.

निवड पद्धत 

यशस्वीरित्या ऑनलाईन अर्ज सादर केलेल्या उमेदवारांची ऑनलाईन पद्धतीने वस्तुनिष्ठ स्वरूपाची परीक्षा घेण्यात येईल. ही परीक्षा पदाकरिता आवश्यक असलेली शैक्षणिक अर्हता व सामान्य अभियोग्यता चाचणी (Aptitude Test) यावर आधारित असेल. 

तसेच परीक्षेचा कालावधी 120 मिनिटांचा असून या कालावधीमध्ये एकूण 130 प्रश्न एकूण 150 गुणांसाठी असणार आहेत. 

उमेदवाराने दिलेल्या प्रत्येक चुकीच्या उत्तरांना शास्ती / दंड असेल त्यानुसार त्या प्रश्नास विहित असलेल्या एकूण गुणांच्या 1/4 (0.25%) इतके गुण दंड म्हणून प्राप्त गुणांमधून वजा करण्यात येऊन अंतिम गुण काढण्यात येतील. तथापि उमेदवाराने एखाद्या प्रश्नाचे उत्तर न दिल्यास, रिक्त ठेवल्यास अशा प्रश्नांना दंड शास्ती लागणार नाही. 

परीक्षा केंद्र 
ऑनलाईन परीक्षा करिता निश्चित केलेली परीक्षा केंद्र खालील प्रमाणे असतील. 

अहमदनगर, अमरावती, छत्रपती संभाजी नगर, चंद्रपूर, धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर, 

परीक्षा शूल्क 
खूल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी परीक्षा शुल्क रुपये 600 आहे. 
मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील उमेदवारांसाठी रुपये 300 परीक्षा शूल्क आहे. 
पात्र दिव्यांग, व माजी सैनिक यांना परीक्षा शूल्क भरण्यापासून सूट देण्यात आली आहे. 

ऑनलाइन अर्ज सादर करण्याचा दिनांक 
दिनांक 31/1/2024 पासून ते दिनांक 9/2/2024 पर्यंत रात्री 11.59 वाजेपर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करता येतील. 

ऑनलाईन परीक्षेची अंदाजित तारीख - 
फेब्रुवारी / मार्च 2024 

भरती प्रक्रिया संबंधिची माहिती वेळोवेळी www.mahatransco.in या वेबसाईट वरील करियर (career) ह्या सदराखाली प्रसिद्ध करण्यात येईल. 

संबंधित उमेदवाराने भरती प्रक्रिया संबंधीच्या अद्ययावत माहितीसाठी कंपनीचे संकेतस्थळ वेळोवेळी पहावे. "Job Vacancy in Mahapareshan Company"

आवश्यक शैक्षणिक अर्हता जाणून घेण्यासाठी सविस्तर जाहीरात वाचावी जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

तुम्हाला ही बातमी आवडली असेल अशी आशा करतो धन्यवाद.

Post a Comment

0 Comments