चर्मकार समाजाच्या विविध मागण्यांसंदर्भात आज दिनांक 12 फेब्रुवारी 2024 रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित बैठकीत चर्चा करण्यात आली. जाणून घेऊ या विषयी सविस्तर माहीती.
चर्मकार समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध मूख्यमंञी एकनाथ शिंदे यांची ग्वाही
चर्मकार समाजाच्या विविध मागण्यां संदर्भात मूख्यमंञी एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. 'Meeting for Shoemaker'
- शासनाने गटई कामगारांना व्यवसायासाठी दिलेल्या स्टॉल्सची तोडफोड थांबवून त्यांचे योग्य ठिकाणी पुनर्वसन करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महानगरपालिका, नगरपालिकांना दिल्या आहेत.
- चर्मकार समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही देतानाच चर्मकार विकास आयोगाला पुनर्जिवीत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
- गोवंडी येथे संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या प्रशिक्षण केंद्राची बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून उभारणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी या बैठकीत दिले.
- महामंडळाकडून व्यवसायासाठी कर्ज घेतलेल्या कर्त्या पुरुषाचे निधन झाल्यास उर्वरित कर्जमाफी करण्याच्या प्रस्तावाचा आढावा घेण्याच्या सूचना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी महामंडळाला दिल्या.
- परदेश शिष्यवृत्तीच्या संख्येत वाढ करण्याचा प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळासमोर ठेवण्यात येणार
- रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळामधील रिक्त पदांच्या भरतीची कार्यवाही जलदगतीने करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.
यावेळी क्रीडा व युवक कल्याणमंत्री संजय बनसोडे, खासदार सदाशिवराव लोखंडे, आमदार दिलीप लांडे, माजीमंत्री बबनराव घोलप, महानगरपालिका आयुक्त आय. एस. चहल, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव गोविंदराज, सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे, संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक धम्मज्योती गजभिये यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. "Meeting for shoemaker"
0 Comments