साठ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांची वर्षातून दोन वेळा मोफत आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे तसेच आरोग्य तपासणी केल्यानंतर काही आजार आढळून आल्यास त्या आजारावर महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचार करण्यात येणार आहेत.
या बाबतचा शासन निर्णय GR महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाने दिनांक 15 फेब्रुवारी 2024 रोजी प्रसिद्ध केला आहे जाणून घेऊ या विषयी सविस्तर माहिती.
ज्येष्ठ नागरिकांची वर्षातून दोन वेळा होणार मोफत आरोग्य तपासणी काही आजार आढळून आल्यास होणार मोफत उपचार शासनाचा GR प्रसिद्ध
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 17 मे 2023 रोजी ज्येष्ठ नागरिकांच्या प्रलंबित मागण्या बाबत बैठक संपन्न झाली होती या बैठकीमध्ये ज्येष्ठ नागरिकांना सर्वकष आरोग्य सुविधा पुरविण्याचे निर्देश मूख्यमंञी यांनी दिले होते. 'Old Age Person Free Health Checkup'
या निर्देशानुसार वैद्यकीय शिक्षण व औषधीद्रव्य विभागाच्या अधिपत्याखालील शासकीय वैद्यकीय / दंत महाविद्यालये व रूग्णालयांमध्ये ज्येष्ठ नागरिकांना आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी विशेष उपाययोजना राबविण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार शासनाने विशेष उपाययोजना नूसार ज्येष्ठ नागरिकांना सर्वकष आरोग्य सुविधा पुरविण्याचा निर्णय घेतला आहे.
ज्येष्ठ नागरिकांना आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी खालील विशेष उपाययोजना राबविण्यास शासनाने मान्यता दिली आहे.
साठ वर्षावरील जेष्ठ नागरीकांना आरोग्य सूविधा पूरविण्यासाठी खालील विशेष उपाययोजना शासनाने निश्चित केल्या आहेत. शासन निर्णयामधील सूचना व तरतूदी खालीलप्रमाणे.
१) वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनायाच्या अख्त्यारीतील सर्व वैद्यकीय / दंत अतिविशेषोपचार महाविद्यालये व रुग्णालयांमार्फत साठ वर्षावरील सर्व ज्येष्ठ नागरिकांचे वर्षातून दोन वेळा मोफत आरोग्य चाचणी / तपासणी करण्यात यावी सदर आरोग्य तपासणीची नोंद आभा कार्ड, एचएमआयएस प्रणाली मध्ये घेतली जाईल.
२) ज्येष्ठ नागरिकांचे राज्यातील 1.50 कोटी संख्या विचारात घेता सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या तपासणीसाठी डॉक्टर व संबंधित चाचणी / तपासण्याकरिता आठवड्यातील दोन दिवस राखीव ठेवण्यात येतील.
३) सर्व ज्येष्ठ नागरिकांच्या वैद्यकीय तपासणीत दूर्दैवाने काही आजार आढळून आल्यास त्यावर महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या अटी व शर्ती अनुसार उपचार करण्यात यावेत. अशी तरतूद शासन निर्णयामध्ये आहे.
४) सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात ज्येष्ठ नागरिकांना आभा कार्ड उपलब्ध करून देण्याची सुविधा असावी.
५) संचालनालय अधिनस्थ संस्थेत Palliative Ward यांची टप्प्या टप्प्यात वाढ करण्यात यावी. असे GR मध्ये नमूद आहे.
या वरील पाच सूचना व तरतूदीनुसार ज्येष्ठ नागरिकांना आरोग्य सुविधा पुरविण्यात येणार आहे.
आयुक्त वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय यांनी वरील सूचना सर्व अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यांच्या निदर्शनास आणाव्यात व त्या सूचनांचे तंतोतंत पालन होईल यासाठी आवश्यक खबरदारी घ्यावी. अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यांनी सदर योजनेचा माहिती फलक रुग्णालयाच्या परिसरातील प्रथमदर्शनी भागात लावावे असे स्पष्ट निर्देश शासन निर्णय जीआर मध्ये देण्यात आले आहेत.
संचालनालय अधिनस्त शासकीय वैद्यकीय / दंत महाविद्यालय व रुग्णालयांमध्ये ज्येष्ठ नागरिकांना आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी येणारा खर्च संबंधित संस्थाच्या त्या वर्षात अर्थसंकल्पीत केलेल्या तरतुदीतून भागविण्यात येणार आहे.
अशा प्रकारे वरील मार्गदर्शक सूचनानुसार साठ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांची वर्षातून दोन वेळा आरोग्य तपासणी व आरोग्य चाचणी मोफत करण्यात येणार आहे.
या आरोग्य तपासणी मध्ये दुर्दैवाने काही आजार आढळून आल्यास ज्येष्ठ नागरिकांना महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून मोफत उपचार उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. "Old Age Person Free Health Checkup"
तुम्हाला हा लेख आवडला असेल अशी आशा करतो धन्यवाद.
0 Comments