राज्यातील तरुणांसाठी आनंदाची बातमी शंभर टक्के होणार पोलीस भरती Police Department Vacancy

Police Department Vacancy
Police Department Vacancy 

पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्यात आता 100% पोलीस भरती होणार आहे. 100% पोलीस भरती करण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. 

या बाबतचा शासन निर्णय राज्य शासनाने प्रसिद्ध केला आहे. जाणून घेऊ या बाबत सविस्तर माहिती.

राज्यातील तरुणांसाठी आनंदाची बातमी शंभर टक्के होणार पोलीस भरती Police Department Vacancy 

राज्यात शंभर टक्के पोलीस भरती करण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. 'Police Department Vacancy' यामुळे पोलीस भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे.

राज्यात तब्बल 17 हजार 471 पोलिसांची भरती होणार आहे. 

राज्य सरकारच्या इतर विभागांना फक्त 50% पदांची भरती करता येते पण पोलीस खात्यात शंभर टक्के पद भरतीला मान्यता देण्यात आली आहे.

पोलीस शिपाई, बँड्समन, पोलीस शिपाई, चालक, सशस्त्र पोलीस शिपाई, आणि कारागृह शिपाई अशी एकूण 17,471 पदांची भरती केली जाणार आहे.

सन 2022 व सन 2023 या वर्षातील दिनांक 31/12/2023 अखेरपर्यंत राज्यातील पोलीस दलातील पोलीस घटक प्रमुखांच्या अस्थापनेवरील शिपाई संवर्गातील पोलीस शिपाई, बँड्समन, पोलीस शिपाई चालक, सशस्त्र पोलीस शिपाई, व कारागृह शिपाई, अशा एकूण 17471 पदे 100% भरण्यास वित्त विभागाच्या दिनांक 30/9/2022 रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदी मधून सूट देण्यात आली आहे.

प्रस्तुत भरती प्रक्रिया मधील पदे भरण्याची कार्यवाही करताना आवेदन पत्र (अर्ज) प्राप्त झाल्यानंतर संपूर्ण भरती प्रक्रिया घटक स्तरावर राबविण्यात येते. त्यानुसार परीक्षा ऑनलाईन पद्धतीने किंवा OMR आधारित घेण्याची मूभा संबंधीत घटक कार्यालयास पोलीस अधीक्षक, पोलीस आयुक्त, समादेशक, इतर सक्षम प्राधिकारी यांना देण्यात आली आहे. 

जे घटक कार्यालय OMR आधारित परीक्षा घेण्याबाबत निर्णय घेतील त्यांना सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक 21 नोव्हेंबर 2022 रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदी मधून सूट देय असेल. 

सदर भरती प्रक्रिया अंतर्गत आवेदन अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांचे एकत्रित अर्ज स्वीकृती, छाननी, व तत्सम कामाकरिता बाह्य सेवा पुरवठादार कंपनीची निवड करण्याचे अधिकार अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके महाराष्ट्र राज्य मुंबई. यांना देण्याचा निर्णय राज्य शासनाने शासन निर्णयाद्वारे घेतला आहे.

सदरहू परीक्षा पद्धतीच्या अनुषंगाने शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचना आदेशानुसार पोलीस घटकांना सविस्तर सूचना देण्याकरिता पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांनी परिपत्रक निगर्मित करावे असे निर्देश या शासन निर्णयाद्वारे राज्य शासनाने दिले आहे.

सदरची भरती प्रक्रिया पारदर्शीपणे राबविण्याची व सनियंत्रण करण्याची संपूर्ण जबाबदारी पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य मुंबई यांची राहील असे शासन निर्णयाद्वारे राज्य शासनाने निश्चित केले आहे. 

परीक्षा संदर्भात आक्षेप, वाद, न्यायालयीन प्रकरण, विधानमंडळ कामकाज विषयक बाबी उद्भवल्यास त्याची जबाबदारी पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई व त्यांचे अधिनस्त संबंधित घटक, गट प्रमुखांची राहील असे शासन निर्णयाद्वारे निश्चित करण्यात आले आहे.

आशा प्रकारे या 31 जानेवारी 2024 रोजीच्या शासन निर्णया मधील तरतुदीनुसार पोलिसांची शंभर टक्के भरती होणार आहे. "Police Department Vacancy"

शासन निर्णय GR येथे डाऊनलोड करा

तुम्हाला हा लेख आवडला असेल अशी अशा करतो धन्यवाद.

Post a Comment

0 Comments