Railway Projects inauguration प्रधानमंञी नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमीपूजन,लोकार्पण,उद्घाटन दूरदृष्य प्रणालीद्वारे संपन्न झाले.
या कार्यक्रम प्रसंगी मूख्यमंञी एकनाथ शिंदे हे सूद्धा मरीन लाईन्स रेल्वे स्थानक येथे उपस्थीत होते.जाणून घेऊ या विषयी सविस्तर माहीती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विविध रेल्वे प्रकल्पांचे उद्घाटन संपन्न Railway Projects inauguration
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीव्दारे दिनांक 26 फेब्रुवारी 2024 रोजी ४१ हजार कोटी रुपयांचे विविध रेल्वे प्रकल्प, अमृत भारत स्टेशन योजनेच्या अंतर्गत ५५४ रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास आणि दीड हजार उड्डाणपूल आणि अंडरपासचे भूमिपूजन संपन्न झाले. तसेच लोकार्पण, उद्घाटन करण्यात आले. 'Railway Projects inauguration'
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव हे दूरदृश्य प्रणालीद्वारे तर मरीन लाईन्स रेल्वे स्थानक येथे आयोजित कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कौशल्य उद्योजकता विकास मंत्री मंगल प्रभात लोढा उपस्थित होते.
देशात विविध क्षेत्रातील पायाभूत सुविधांची कामे मोठ्या प्रमाणावर व प्रचंड गतीने होत आहेत. याद्वारेच रोजगारासाठीही मोठी चालना मिळत आहे. रेल्वे यंत्रणाही वेगाने बदलत आहे. रेल्वेचा कायापालट होत आहे. रेल्वेस्थानके अत्याधुनिक सुविधांनी युक्त करण्यासाठी अमृत भारत रेल्वेस्टेशन योजनेचा आरंभ करण्यात आला. या अत्याधुनिकीकरणामुळे रेल्वे स्थानक परिसरात रोजगार निर्मितीलाही मोठ्या प्रमाणात चालना मिळेल असे सांगून भारतीय रेल्वे देशवासियांसाठी ' ईज ऑल ट्रॅव्हल' झाले आहे, असे प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या प्रसंगी केले. Railway Projects inauguration
मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. या महानगरातून दररोज किमान ७३ लाख प्रवासी उपनगरी रेल्वेने प्रवास करतात. एवढ्या संख्येने प्रवास करणारे प्रवासी असलेले हे एकमेव शहर आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशभरातील २०५१ विविध रेल्वे प्रकल्पांचं भूमिपुजन झाले. या प्रकल्पांमध्ये महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांचा समावेश असून ५६ स्थानकांचा समावेश आहे, ही आनंदाची बाब असल्याचे मत यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्रातील रेल्वे पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी भारतीय रेल्वेकडून मोठी मदत होत आहे. सध्या राज्यात २२७४ कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे अमृत भारत स्टेशन, रोड ओव्हर ब्रीज ROB आणि RUB असे २४१ रेल्वे प्रकल्प प्रगतीपथावर आहेत. यावर्षीच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी १५ हजार ५५४ कोटी रुपयांची विक्रमी तरतूद करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील ५६ स्थानके जागतिक दर्जाची रेल्वे स्थानके म्हणून विकसित करण्यात येणार आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यामुळे अन्य इन्फ्रा प्रोजेक्टप्रमाणे महाराष्ट्रातील रेल्वे मार्गांच्या विस्ताराला बळ मिळत आहे.
राज्यातील रेल्वेचे जाळे विस्तारण्यासाठीही केंद्राचे विशेष पाठबळ लाभत आहे. वंदे भारत या श्रेणीतही महाराष्ट्राला सात नव्या रेल्वेगाड्या मिळाल्या आहेत, असेही मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे पूढे बोलताना म्हणाले. "Railway Projects inauguration"
तूम्हाला ही बातमी आवडली असेल अशी आशा करतो धन्यवाद.
0 Comments