Rajpatrit Adhikari Mahasangh Vardhapan Din मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचा ३८ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा करण्यात आला.
महाराष्ट्र राज्य राजपञित अधिकारी महासंघाचा ३८ वा वर्धापन दिन मूख्यमंञी यांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा
महासंघाच्या कल्याण केंद्रासाठी आवश्यक तो निधी देण्याबरोबरच जुन्या निवृत्ती वेतन योजनेबाबत येत्या अधिवेशनात सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले.
राज्याच्या कारभारात अधिकाऱ्यांचे मोठे योगदान असून अधिकारी हे शासनाचे अविभाज्य अंग आहेत. सरकार आणि प्रशासन ही लोकशाही रथाची दोन चाके आहेत. ही दोन्ही चाके समान वेगाने धावली की विकास वेगाने होतो, याचे उदाहरण राज्यात पहायला मिळत असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले.
राज्यातील शेतकरी, कामगार, कष्टकरी, महिला, ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी अनेक योजना सरकार राबवत आहे, अनेक लोककल्याणकारी निर्णय घेत आहे. या योजना आणि निर्णय लोकांपर्यंत पोहचविण्याचे आणि त्याचा लाभ जनतेला देण्याचे काम प्रशासन करत आहे. त्यातून सरकारची सकारात्मक प्रतिमा निर्माण करण्याचे काम हे अधिकारी करत असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले. Rajpatrit Adhikari Mahasangh Vardhapan Din
कोकण विभागीय आयुक्त महेंद्र कल्याणकर, जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर, राजेंद्र भोसले, महासंघाचे मुख्य सल्लागार ग. दि. कुलथे, अध्यक्ष विनोद देसाई, सरचिटणीस समीर भाटकर, कोषाध्यक्ष नितीन काळे, कल्याण केंद्र समन्वयक सुदाम टाव्हरे यांचेसह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, महासंघाचे सदस्य याप्रसंगी उपस्थित होते. "Rajpatrit Adhikari Mahasangh Vardhapan Din"
तूम्हाला ही बातमी आवडली असेल अशी आशा करतो धन्यवाद.
0 Comments