आदिवासी भागातील कूपोषण कमी करण्यासाठी मूख्यमंञी एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न Meeting for reduce malnutrition in tribal area

Meeting for reduce malnutrition in tribal area
Meeting for reduce malnutrition in tribal area

Meeting for reduce malnutrition in tribal area आदिवासी भागातील कूपोषण कमी करण्यासाठी गठीत कार्यदलाची बैठक महाराष्ट्र राज्याचे मूख्यमंञी एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. जाणून घेऊ या बाबत सविस्तर माहीती.

आदिवासी क्षेञातील कूपोषण कमी करण्यासाठी मूख्यमंञी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आदिवासी क्षेत्रातील कुपोषण कमी करण्यासाठी गठीत कार्य दलाची बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे पार पडली. 'Meeting for reduce malnutrition in tribal area'

कार्यदलाचे अध्यक्ष डॉ. दीपक सावंत यांनी कार्य दलाचा पहिला अहवाल मुख्यमंत्री श्री. शिंदे यांना सुपुर्द केला. 

आदिवासी भागातील पोषण आहार आणि आरोग्य सेवा सुधारण्यावर राज्य शासनाचे विविध विभाग समन्वयाने काम करीत असल्याने कुपोषणाचे प्रमाण कमी होतांना दिसते, मात्र  कृती दलाच्या शिफारशींची प्रभावी अंमलबजावणी करून हे प्रमाण आणखीही कमी झाले पाहिजे असे सांगून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याकामी सरपंचांचा सहभाग वाढविण्याची आणि आदिवासी भागात मोठ्या प्रमाणावर शिबिरे घेण्याचे निर्देश दिले.  

प्रारंभीक विभागाने केलेल्या सादरीकरणात गेल्या तीन वर्षात आदिवासी भागातील कुपोषणाचे प्रमाण १.८२ टक्केवरून १.६२ टक्के इतके कमी झाल्याचे आणि उर्वरित राज्यातील कुपोषणाचे प्रमाण १.४३ टक्केवरून १.२२ टक्के इतके कमी झाल्याची माहिती देण्यात आली.  

आरोग्य सेविका, अंगणवाडी कार्यकर्ती, आशा स्वयंसेविका व आयुष यांच्याजोडीने सरपंचांशी देखील समन्वय साधून आरोग्य आणि पोषण सेवा देण्यात येत आहेत अशी माहिती यावेळी देण्यात आली.        

ग्रामविकासात सरपंचाची मोठी भूमिका असते. सरपंचांचे देखील आपापल्या गाव, पाड्यामधील कुपोषण कमी करण्यात सहभाग असणे गरजेचे आहे. 

चावडी वाचन, शिबिरे या माध्यमातून कुपोषित महिला, बालके यांची माहिती वेळीच प्रशासनाला कळेल आणि त्यावर त्वरेने उपाययोजना करता येतील. 

सध्या आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना माध्यान्ह भोजन देण्यात येते. ही योजना नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना देखील देण्यासंदर्भात तसेच अमृत आहार योजना शहरी भागात देखील देण्यासंदर्भात मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव आणण्याच्या सूचना देखील यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिल्या. "Meeting for reduce malnutrition in tribal area"

तूम्हाला हा लेख आवडला असेल अशी आशा करतो धन्यवाद .

Post a Comment

0 Comments