Rmo Payment Increase दिनांक 7/2/2024 रोजी सेंट्रल मार्ड संघटनेच्या मागण्यांसंदर्भात बैठक पार पडली.
या बैठकीमध्ये निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मागण्या बाबत सविस्तर चर्चा करण्यात येवून त्यांच्या मागण्या मान्य करण्यात आल्या.
राज्यातील निवासी वैद्यकीय अधिकारी यांच्या सर्व मागण्या मंजूर विद्यावेतनात १० हजार रुपयांची भरीव वाढ
राज्यातील निवासी वैद्यकीय अधिकारी यांच्या मागण्या संदर्भात उपमूख्यमंञी अजित पवार यांच्या उपस्थितीत महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली.
या बैठकीमध्ये निवासी वैद्यकीय अधिकारी यांच्या विद्यावेतनात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला तसेच इतर मागण्या सूद्धा मंजूर करण्यात आल्या. 'Rmo Payment Increase'
राज्यातील निवासी वैद्यकीय अधिकारी यांच्या सर्व मागण्या मंजूर करण्यात आल्या असून त्यांच्या विद्यावेतनात १० हजार रुपयांची भरीव वाढ करण्यासह त्यांचे विद्यावेतन प्रत्येक महिन्याच्या ठराविक तारखेला नियमितपणे देण्याची ग्वाही उपमूख्यमंञी अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत उपमूख्यमंञी अजित पवार यांनी दिली असून या बैठकीत निवासी डॉक्टरांच्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या.
निवासी डॉक्टरांच्या वसतिगृहांची दुरुस्ती करणे अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने वसतिगृहांच्या दुरुस्तीची कामे तातडीने हाती घ्यावीत. विविध जिल्ह्यांत मंजूर करण्यात आलेल्या वसतिगृहांच्या बांधकामांना गती देण्यात यावी. असे निर्देश उपमूख्यमंञी अजित पवार यांनी दिले.
शासनाने नवीन वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करताना त्याच्या आराखड्यात नवीन वसतिगृहाचा समावेश केला आहे. त्यामुळे नवीन महाविद्यालयांमधील डॉक्टरांना पहिल्या दिवसापासूनच चांगल्या दर्जाची वसतिगृहे उपलब्ध होणार आहेत.
अस्तित्वातील वसतिगृहांच्या दुरुस्तीसाठीचा निधी वितरित करण्यात आला आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने या कामाला प्राधान्य देऊन तातडीने दुरुस्तीची कामं सुरू करावीत. त्यात कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही. असे उपमूख्यमंञी म्हणाले.
राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन झाल्यानंतर आज दिनाक 7/2/2024 रोजी घेण्यात आलेल्या निर्णयांच्या कार्यवाहीचा आढावा घेण्यात येणार आहे असेही उपमूख्यमंञी यांनी सांगितले.
वसतिगृहांच्या दुरुस्तीदरम्यान विद्यार्थ्यांना इतर ठिकाणी राहण्याची व्यवस्था करून देणे गरजेचं असतं. मात्र, वैद्यकीय शिक्षण विभागाच्या रुग्णालयांच्या परिसरात पर्यायी मोकळ्या खोल्या मिळण्यात अडचणी येतात. अशावेळी गरजेच्या ठिकाणी विद्यार्थ्यांना भाड्याने खोल्या घेऊन राहता येण्यासाठी ठराविक भाडे देण्यात यावे. शक्य असेल त्याठिकाणी त्यांना पर्यायी खोल्या उपलब्ध करून देण्यात याव्यात, असे निर्देश उपमूख्यमंञी अजित पवार यांनी संबंधितांना दिले. "Rmo Payment Increase"
तूम्हाला ही बातमी आवडली असेल अशी आशा करतो धन्यवाद.
0 Comments