महाराष्ट्र राज्याचे मूख्यमंञी एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज दिनांक 14 फेब्रुवारी 2024 रोजी मंत्रालयात राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली या मंञीमंडळ बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. जाणून घेऊ या विषयी सविस्तर माहीती.
14 फेब्रुवारी 2024 रोजीच्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले महत्वाचे निर्णय.
दिनांक 14 फेब्रुवारी 2024 रोजी मूख्यमंञी एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंञालयात पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते. 'State Government Cabinet Decisions'
मंत्रिमंडळ बैठकीतील संक्षिप्त निर्णय खालीलप्रमाणे.
- मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत अतिरिक्त ७ हजार कि.मी. रस्ते व पुलाची कामे करण्यास मंञीमंडळाची मंजूरी.
- ऑनलाईन पद्धतीने वाळू, रेती पुरविण्यासाठी सर्वंकष सुधारित रेती धोरण. 'ना नफा, ना तोटा' तत्त्वावर वाळू विक्री दर निश्चित करणार. ना नफा ना तोटा तत्वावर वाळू विक्री करण्यासाठी वाळू विक्री दर निश्चित करण्याच्या निर्णयास मंञीमंडळाने मान्यता दिली आहे.
- शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील इंटर्नशिप विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात भरीव वाढ. आता मिळणार दरमहा १८ हजार रुपये विद्यावेतन.
- राज्य शासकीय कर्मचाऱ्यांची मागणी मान्य. आश्वासित प्रगती योजनेत सुधारणा करण्यास मंञिमंडळाची मान्यता.
- उच्च तंत्रज्ञानाच्या अतिविशाल उद्योगांना प्रोत्साहन देण्यात येणार असून राज्यातील कमी विकसित भागांना या निर्णयाचा फायदा होणार आहे.
- सायन कोळीवाड्यातील सिंधी निर्वासितांच्या २५ इमारतींचा पुनर्विकास करण्यात येणार. म्हाडा करणार विकास.
- अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनेसाठी सुधारित मार्गदर्शक सूचना.
- राज्यात जळगाव, लातूर, बारामती, सांगली (मिरज), नंदुरबार, गोंदिया या सहा ठिकाणी नर्सिंग महाविद्यालय स्थापन करण्यास मंञिमंडळाची मान्यता.
- औद्योगिक क्षेत्रात पायाभूत सुविधांना प्रोत्साहन देणार. ५० टक्के मुद्रांक शुल्क सवलत देण्यात येणार
- भुदरगड तालुक्यात नवीन समाजकार्य महाविद्यालय स्थापन करण्यात येणार.
याप्रमाणे हे महत्वपूर्ण निर्णय मंञीमंडळ बैठकीत घेण्यात आले आहेत. "State Government Cabinet Decisions"
तूम्हाला हा लेख आवडला असेल अशी आशा करतो धन्यवाद.
0 Comments