Strawbarry with CM programme सातारा जिल्ह्यातील पाचगणी येथील बिलीमोरिया शाळेच्या सभागृहात 'स्ट्रॉबेरी विथ सीएम' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जाणून घेऊ या विषयी सविस्तर माहीती.
स्ट्रॉबेरी पिकाला शासन अनुदान देण्यासाठी शासन प्रयत्नशील - मूख्यमंञी एकनाथ शिंदे Strawberry Farming Government Subsidy.
सातारा जिल्ह्यातील पाचगणी येथील बिलीमोरिया शाळेच्या सभागृहात 'स्ट्रॉबेरी विथ सीएम' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 'Strawberry Farming Government Subsidy'
या कार्यक्रमाला उपस्थित राहून मूख्यमंञी यांनी स्थानिक स्ट्रॉबेरी उत्पादकांशी संवाद साधला, तसेच पॅराग्लायडिंग प्रि-वर्ल्ड कप स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना सन्मानित केले.
महाबळेश्वर तालुक्यात मोठ्या प्रमाणात स्ट्रॉबेरी उत्पन्न घेतले जाते. या उत्पन्नावरच येथील शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून आहे.
शेतकऱ्यांच्या हितासाठी स्ट्रॉबेरी पिकाला शासन अनुदान देण्यासाठी शासन प्रयत्नशील असून याबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याशी चर्चा केली जाईल, अशी ग्वाही यावेळी मूख्यमंञी एकनाथ शिंदे यांनी दिली.
बांबू लागवडीसाठी शासन अनूदान देत असून शेतकऱ्यांनी बांबू लागवड करावी मूख्यमंञी एकनाथ शिंदे यांचे अवाहन
येथील शेतकऱ्यांनी बांबू लागवडीकडे वळावे. बांबू नगदी पीक असून बांबूपासून फर्निचर, इथेनॉल निर्मिती करता येते. Bamboo Farming
बांबू लागवडीसाठी शासन अनुदान देत असून याचा लाभ घ्यावा असे आवाहनही यावेळी मूख्यमंञी यांनी केले. स्ट्रॉबेरी पासून वाईन निर्मितीचा प्रकल्पही महाबळेश्वर येथे उभारण्यात येईल, असेही यावेळी बोलताना मूख्यमंञी यांनी स्पष्ट केले.
पॅराग्लायडिंग हा एक साहसी खेळ असून तो खेळणे साहसी लोकांचे काम आहे. वर गेलेल्या माणसाच्या क्षमतेची कसोटी लागते. या खेळात सहभागी होण्यासाठी आलेल्या १२ देशांतील खेळाडूंचे स्वागत मूख्यमंञी यांनी केले.
तसेच लवकरच या खेळाचा वर्ल्ड कप देखील महाराष्ट्रात खेळावला जावा यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही मूख्यमंञी एकनाथ शिंदे यांनी दिली. "Strawberry Farming Government Subsidy"
या कार्यक्रमाला साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, आमदार मकरंद पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, अप्पर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, टाईम महाराष्ट्रचे मुख्य संपादक राजेश कोचेकर, जिल्हाध्यक्ष कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे यांच्यासह महाबळेश्वर तालुक्यातील स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments