मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे सफाई कामगार पदाच्या जागा Bombay High Court requirement

Bombay High Court requirements
Bombay High Court requirements

Bombay High Court requirements मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठ येथे चौथी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांसाठी सफाई कामगार पदाच्या जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.

मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद सफाई कामगार भरती 2024

मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद आस्थापनेवर सफाई कामगार पदाकरिता सहा उमेदवारांची निवड यादी तसेच एका उमेदवाराची प्रतीक्षा यादी तयार करण्यासाठी निरोगी, इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. 'Bombay High Court requirements'

सदरील निवड व प्रतीक्षा यादी प्रसिद्धीच्या दिनांका पासून दोन वर्षासाठी वैध राहील.

अर्ज करण्याचा शेवट दिनांक व पत्ता.

पाञ व इच्छुक उमेदवारांनी विहीत नमून्यातील अर्ज आवश्यक त्या प्रमाणपत्रांच्या स्वतः प्रमाणित केलेल्या छायांकित प्रतिसह दिनांक 10 एप्रिल 2024 रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत किंवा तत्पूर्वी कार्यालयात पोहोचतील या रीतीने फक्त स्पीड पोस्टाद्वारेच पाठवायचे आहेत. Bombay High Court requirements

स्पीड पोस्टद्वारे अर्ज पाठवण्याचा पत्ता :-  
प्रबंधक (प्रशासन)
मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद, 
जालना रोड छत्रपती संभाजीनगर - 431009

स्पीड पोस्ट व्यतिरिक्त इतर कोणत्याही माध्यमातून तसेच वरील नमूद तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा उच्च न्यायालय कार्यालयाच्या वतीने विचार केला जाणार नाही.

पात्रता आणि वयोमर्यादा.

  • उमेदवार भारताचा नागरिक असावा. 
  • उमेदवार किमान चौथी उत्तीर्ण असावा. 
  • जाहिरात प्रसिद्धीच्या दिनांकास उमेदवाराचे वय 18 ते 38 वर्षे असावे.
  • मागासवर्गीय उमेदवारांसाठी वयोमर्यादा 43 वर्षे आहे.
  • न्यायालयीन कर्मचारी किंवा शासकीय कर्मचारी यांना वयाची अट नाही तथापि त्यांनी त्यांच्या कार्यालया मार्फत अर्ज करणे आवश्यक आहे.
  • उमेदवाराला शौचालय व स्नानगृह स्वच्छतेचा, झाडू कामाचा, तसेच कार्यालय परिसर स्वच्छतेचा पुरेसा अनुभव असणे आवश्यक आहे. "Bombay High Court requirements"

जाहीरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

Teacher Vacancy Primary Sainik School Satara प्राथमिक सैनिक शाळा सातारा येथे शिक्षक पदाच्या जागा.

सशस्त्र सेना मेडिकल कॉलेज पुणे भरती 2024 Armed forces medical college job vacancy 2024

Post a Comment

0 Comments