वेबसाईटद्वारे होणार अनूदानाचे वाटप, लाभार्थ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये थेट जमा होणार अर्थसहाय्य. Website For DBT

Website for dbt
website for dbt

Website For DBT अनूदानाचे वाटप थेट लाभार्थ्यांच्या आधार लिंक खात्यामध्ये करण्यासाठी संकेतस्थळाचे अनावरण महाराष्ट्र राज्याचे मूख्यमंञी एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाले आहे. जाणून घेऊ या विषयी सविस्तर माहीती.

अनूदानाचे वाटप थेट लाभार्थ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये करण्यासाठी संकेतस्थळाचे अनावरण मूख्यमंञी यांच्या हस्ते संपन्न.

अनूदानाचे वाटप थेट लाभार्थ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये करण्यासाठी संकेतस्थळाचे अनावरण मूख्यमंञी यांच्या हस्ते संपन्न झाले आहे. 

या संकेतस्थळाचा (Website) उपयोग संजय गांधी निराधार अनुदान योजना, व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजने मधील लाभार्थ्यांना अनूदान वाटप करण्यासाठी करण्यात येणार आहे. 'Website For DBT'

महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व  विशेष सहाय्य विभागाने विकसित केलेल्या या अद्ययावत संकेतस्थळाचे अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज दिनांक 13 मार्च 2024 रोजी करण्यात आले. यावेळी वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांचेसह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.  

संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेमधील लाभार्थ्यांना DBT (Direct Benefit Transfer) द्वारे थेट लाभ हस्तांतरण करण्याकरिता https://sas.mahait.org/ हे संकेतस्थळ विकसित करण्यात आलेले आहे.

या संकेतस्थळाच्या सहाय्याने लाभार्थीनां अनूदानाचे वाटप थेट त्यांच्या आधारलिंक बँक खात्यामध्ये करण्यात येणार आहे.

राज्यात संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे १५,९७,११६ तर श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेचे २९,६२,०१५ असे एकूण ४५,५९,१३१ इतके लाभार्थी आहेत. 

संजय गांधी निराधार अनूदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना दरमहा दीड हजार रुपये इतके अर्थसहाय्य देण्यात येते. 

विकसित करण्यात आलेल्या या संकेतस्थळाद्वारे संबंधित लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण थेट त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात लवकरच करण्यात येणार आहे. "Website For DBT"

तूम्हाला हा लेख आवडला असेल व तूम्ही हा लेख इतरांना फायदा होण्याच्या दृष्टीने त्यांच्यासोबत नक्कीच शेअर कराल अशी आशा करतो धन्यवाद.

Post a Comment

0 Comments