Job vacancy palghar जिल्हा परिषद पालघर येथे विधी कक्षासाठी मानधन तत्वावर कंत्राटी वकील यांची नियुक्ती करण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
जिल्हा परिषद पालघर कंत्राटी वकील भरती - 2024
पालघर जिल्हा परिषद अंतर्गत प्रलंबित न्यायालयीन व अर्धन्यायिक प्रकरणे हाताळण्यासाठी विधी कक्षा करिता वकिलांची नेमणूक करणे प्रस्तावित आहे. 'Job vacancy palghar'
यानुसार जिल्हा परिषद पालघर विधी कक्षाकरिता पुढील अटी व शर्तीची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांमधून कंत्राटी पद्धतीने मानधन तत्वावर नेमणूक केली जाणार आहे.
- उमेदवाराचे वय कमाल 45 वर्ष व किमान 18 वर्षे असावे.
- बार कौन्सिल ऑफ इंडिया आणि गोवा नोंदणीकृत असावा.
- शैक्षणिक अर्हता एलएलबी / एलएलएम विधी शाखेच्या उच्च पदवीधारकांना प्राधान्य देण्यात येईल.
- अटी व शर्तीची पूर्तता करणाऱ्या जिल्ह्यातील स्थानिक वकील यांना प्राधान्य देण्यात येईल.
- अर्ज करताना पूर्ण नाव, वय, पत्ता, मोबाईल नंबर, शैक्षणिक व कायद्याची पदवी उत्तीर्ण वर्षे, विविध न्यायालयात केलेल्या वकीलीचा अनुभव कालावधी, जिल्हा परिषदेतील न्यायिक प्रकरणाचा अनुभव, सध्याच्या वकिलीच्या व्यवसायाचे ठिकाण, इत्यादी तपशील असलेला बायोडाटा संबंधित कागदपत्रासह अर्जा सोबत असावा.
अर्ज करण्याचा पत्ता व कालावधी
जाहिरात प्रसिद्धीचा दिनांक 15 मार्च 2024 असून सदर पदासाठी अर्ज ही जाहिरात प्रसिद्ध झालेल्या दिनांकापासून पंधरा दिवसाच्या आत सादर करायचे आहेत.
अर्ज करण्याचा पत्ता :- मा. मूख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पालघर तळमजला कक्ष क्रमांक 007 सेक्टर 15 जिल्हा परिषद पालघर नवीन प्रशासकीय इमारत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जवळ कोळगाव ग्रामपंचायत हद्द बोईसर रोड पालघर जिल्हा पालघर - 401404.
अर्जाच्या संख्येप्रमाणे लेखी परीक्षा व मुलाखत घेतली जाईल.
0 Comments