'मूख्यमंञी माझी शाळा, सूंदर शाळा' या अभियानात विजयी शाळांना मूख्यमंञी यांनी केले सन्मानित. Mukhyamantri Mazi Shala Sundar Shala Abhiyan

Mukhyamantri Mazi Shala Sundar Shala Abhiyan
Mukhyamantri Mazi Shala Sundar Shala Abhiyan

Mukhyamantri Mazi Shala Sundar Shala Abhiyan शालेय शिक्षण विभागाच्या वतीने सुरू केलेल्या 'मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा' या अभियानात सहभागी होऊन विजयी ठरलेल्या शाळांना दिनांक 5 मार्च 2024 रोजी मूख्यमंञी एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. 

'मूख्यमंञी माझी शाळा, सूंदर शाळा' या अभियानात विजयी शाळांना मूख्यमंञी यांनी केले सन्मानित.

'मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा' या अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक शाळांचा परिसराचा आणि त्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न करण्यात आला. 'Mukhyamantri Mazi Shala Sundar Shala Abhiyan'

तसेच या अभियानाच्या निमित्ताने शालेय शिक्षण विभागाने केलेल्या तीन स्वतंत्र विक्रमांची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सने घेतली. 

दिनांक 5 मार्च 2024 रोजीच्या या कार्यक्रमात या तिन्ही विक्रमांची घोषणा करून त्याबद्दलची तीन प्रशस्तीपत्रे सुपूर्द करण्यात आली आहेत. 

यावेळी बोलताना राज्याचे मूख्यमंञी एकनाथ शिंदे म्हणाले की राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शिक्षकांना सुधारित निवृत्ती वेतन योजना लागू करण्यात आली आहे, तसेच उर्वरित शिक्षकांना देखील त्यात सामावून घेतले जाईल असे मूख्यमंञी यांनी घोषित केले.  

या अभियानाच्या निमित्ताने तीन वर्ल्ड रेकॉर्ड्स झाल्यामुळे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर आणि शालेय शिक्षण विभागाची जबाबदारी वाढली आहे असेही मूख्यमंञी यांनी नमूद केले. 

शिक्षकांची शाळाबाह्य कामे हळूहळू कमी करण्यात येतील - मूख्यमंञी एकनाथ शिंदे.

आयुष्यात आई वडिलांनंतर शिक्षक हेच मुलांच्या सगळ्यात जवळ असतात. आयुष्याला नवीन आकार देण्याचे काम शिक्षक करत असतात. त्यामुळेच तुम्हाला न्याय देताना हातचे काहीं राखून ठेवले जाणार नाही असे सांगून  शिक्षकांची शाळाबाह्य कामे हळूहळू कमी करण्यात येतील असे मूख्यमंञी एकनाथ शिंदे यांनी या प्रसंगी जाहीर केले. 

तसेच ग्रामीण भागात शाळांमधून होणारी विद्यार्थ्यांची गळती कमी व्हायला हवी अशी अपेक्षा मूख्यमंञी एकनाथ शिंदे यांनी बोलताना व्यक्त केली.

पूढे बोलताना मूख्यमंञी एकनाथ शिंदे म्हणाले आपल्या देशाचा जीडीपी उत्तम आहे, एफडीआयमध्ये राज्य आघाडीवर आहे. कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती उत्तम असल्याने अनेक उद्योग राज्यात गुंतवणुकीला पसंती देत आहेत त्यामुळे भविष्यात अनेक रोजगार निर्माण होणार आहेत असे मूख्यमंञी एकनाथ शिंदे म्हणाले. 

यावेळी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, आमदार कपिल पाटील, आमदार विक्रम काळे, आमदार राजेश पाटील, आमदार शेखर निकम, माजी खासदार रामशेठ ठाकूर, शिक्षक नेते संभाजीराव थोरात, शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल, शिक्षण आयुक्त सुरज मांढरे, गिनीज बुक ऑफ इंडियाचे प्रवीण पटेल आणि मिलिंद वेर्लेकर तसेच राज्यातील विविध शाळांचे शिक्षक, संस्था चालक व विद्यार्थी उपस्थित होते. "Mukhyamantri Mazi Shala Sundar Shala Abhiyan"

तूम्हाला ही बातमी आवडली असेल अशी आशा करतो धन्यवाद.

राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांच्या वेळेमध्ये होणार बदल राज्य शासनाचा निर्णय Change in School Hours

Post a Comment

0 Comments