राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत अहमदनगर येथे विविध पदांच्या 23 जागा Nhm Job Vacancy Ahmadnagar

Nhm Job Vacancy Ahmednagar
Nhm Job Vacancy Ahmednagar

Nhm Job Vacancy Ahmednagr राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत अहमदनगर येथे विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. जाणून घेऊ या विषयी सविस्तर माहिती.

राष्ट्रीय आरोग्य अभियान अहमदनगर येथे विविध पदाच्या 23 जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सक स्तरावरील मेडिकल ऑफिसर, डेंटल सर्जन, ऑडिओलॉजिस्ट, ऑडिओमॅट्रिक असिस्टंट फॉर हेरिंग इम्पायरड चिल्ड्रन, पब्लिक हेल्थ मॅनेजर, फायनान्स कम लॉजिस्टिक कन्सल्टंट, एसटीएलएस, या पदांच्या जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू झाली असून विहित नमुन्यातील परिपूर्ण भरलेले अर्ज इच्छुक उमेदवारांकडून मागविण्यात आले आहेत. 'Nhm Job Vacancy Ahmednagar'

ही पद भरती कंत्राटी स्वरूपाची असून कामगिरी व मूल्यांकनांच्या आधारे उमेदवारांना पुनर्नियुक्ती देण्यात येणार आहे.

पदभरतीसाठी वयोमर्यादा:- 

  • खुल्या प्रवर्गासाठी वयोमर्यादा 18 ते 38 वर्षे आहे. 
  • तर मागासवर्गीय प्रवर्गासाठी वयोमर्यादा 18 ते 43 वर्षे आहे. 
  • राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत असलेल्या उमेदवारांसाठी वयोमर्यादेमध्ये पाच वर्षाची शिथिलता आहे.

पदभरतीसाठी आवश्यक अर्ज शूल्क :-  

खुल्या प्रवर्गातील उमेदवारां करिता रुपये 300 व राखीव प्रवर्गातील उमेदवारांकरिता रुपये 150 रकमेचा धनाकर्ष (डिमांड ड्राफ्ट) अर्ज शुल्क असेल. 

धनाकर्ष (डीडी) पुढील नावे असावा - District integrated health and family welfare soc and 13th finance bank of maharashtra ahmednagar - 414001 ifsc code - MAHB0000937 योग्य त्या धनाकर्ष शिवाय अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. Nhm Job Vacancy Ahmadnagar

अर्ज करण्याचा पत्ता, कालावधी व शेवट दिनांक.

पद भरतीसाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी परिपूर्ण भरलेल्या अर्जासहित शैक्षणिक अर्हतेच्या छायांकित प्रती व डीडी सोबत आपले अर्ज जिल्हा प्रशिक्षण केंद्र, 'जिल्हा रुग्णालय आवार' अहमदनगर येथे कार्यालयीन वेळेत शासकीय सुट्टीचे दिवस वगळून पोस्टाने किंवा समक्ष दिनांक 6 मार्च 2024 ते दिनांक 20 मार्च 2024 रोजीच्या आत सादर करणे आवश्यक असून विहित मुदतीनंतर प्राप्त झालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत असे जाहिरातीमध्ये स्पष्टपणे नमूद आहे.

शैक्षणिक अर्हता - पदानुसार शैक्षणिक अर्हता व निवड प्रक्रिया जाणून घेण्यासाठी कृपया मूळ जाहिरात डाउनलोड करावी.

जाहिरात डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

तुम्हाला "Nhm Job Vacancy Ahmadnagar" हा लेख आवडला असेल व तुम्ही हा लेख इतरांना फायदा होण्याच्या दृष्टीने त्यांच्यासोबत नक्कीच शेअर कराल अशी आशा करतो धन्यवाद.

Post a Comment

0 Comments