PM Suraj Portal पीएम-सुरज’ पोर्टलचे प्रधानमंञी नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले आहे. जाणून घेऊ या विषयी सविस्तर माहीती.
PM Suraj Portal पीएम-सुरज’ पोर्टलचे प्रधानमंञी नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण
देशातील वंचित व मागासवर्गातील जनतेच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आलेल्या ‘पीएम-सुरज’ पोर्टलचे दिनांक 14 मार्च 2024 रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.
वंचित व मागास घटकांचा विकास झाल्याशिवाय देश विकसित होणार नाही. त्यामुळे देशातील वंचित आणि मागास घटकांच्या विकासावर केंद्र सरकार भर देत असल्याचे प्रधानमंत्री मोदी यांनी यावेळी सांगितले.
यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अहमदनगर जिल्ह्यातील नरेश साहेबराव अवचर या उद्योजकाशी संवाद साधला.
नरेश हे कृषीतील निरूपयोगी पाण्यावर प्रक्रिया करण्याबाबत काम करत आहेत. त्यांनी ‘असिम’ म्हणजेच डॉ. आंबेडकर सोशल इनोव्हेशन मिशन अंतर्गत अर्थसहाय्य मिळवून हा उद्योग सुरू केल्याचे सांगितले. त्यांच्या या उद्योगाने प्रभावित झाल्याचे सांगून प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी, कृषी सोबतच पर्यावरणासाठीही चांगले काम करत असल्याबद्दल नरेश यांचे कौतुक केले.
पीएम-सूरज पोर्टल लोकार्पणाच्या निमित्ताने मुंबईत आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नमस्ते योजनेंतर्गत सफाई कामगारांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पीपीई-किटचे वाटप करण्यात आले.
सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर, कौशल्य विकास उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार राहुल शेवाळे तर दूरदृश्य प्रणालीद्वारे केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री विरेंद्र सिंह यांच्यासह विविध राज्यातील लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments