ग्रामपंचायतींना मूख्यमंञी जनकल्याण कक्षाच्या वतीने वैद्यकीय साहीत्याचे वाटप,विद्यार्थ्यांसाठी Html,Coding प्रशिक्षण केंद्र

Skilled Development Online Coarse
Skilled Development Online Coarse

Mukhyamantri Jankalyan Kaksh पुणे, ठाणे व रायगड जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना मूख्यमंञी जनकल्याण कक्षाच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दिनांक 29 फेब्रुवारी 2024 रोजी वैद्यकीय साहित्याचे वितरण करण्यात आले.

तसेच रायगड जिल्ह्यातील सावरोली येथील ३० विद्यार्थ्यांसाठी कौशल्य विकासाच्या ऑनलाईन प्रशिक्षणाचा प्रारंभ (Skilled Development Online Coarse) करण्यात आला. जाणून घेऊ या विषयी सविस्तर माहीती.

मूख्यमंञी जनकल्याण कक्षाच्या वतीने ग्रामपंचायतींना वैद्यकीय साहीत्याचे वाटप

मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाच्या माध्यमातून पुणे, ठाणे व रायगड जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वैद्यकीय साहित्याचे वितरण करण्यात आले. 

तसेच रायगड जिल्ह्यातील सावरोली येथील ३० विद्यार्थ्यांसाठी कौशल्य विकासाच्या ऑनलाईन प्रशिक्षणाचा प्रारंभ करण्यात आला. Skilled Development Online Coarse

कोपरन रिसर्च लॅबोरेटरीज, सँडोज प्रायव्हेट लिमिटेड,  एमेरिकेअर्स इंडिया फाऊंडेशन यांच्यावतीने सामुदायिक वैद्यकीय साहित्याचे तसेच ऑनलाईन प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यात आले आहे. 

प्रत्येक उत्सव मंडळाच्या माध्यमातून किमान पाचशे ते सहाशे कुटुंबांना तसेच दहा ते बारा चाळी, सोसायट्या यामधील नागरिकांपर्यंत वैद्यकीय साहित्य पोहचवण्यात येणार आहे.  यासाठी मुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्यातील नोंदणीकृत सार्वजनिक उत्सव मंडळे, को-ऑप सोसायटी यांना एकूण २९१ संच तसेच पुणे, पिंपरी-चिंचवड एकूण ७९ संच, रायगड जिल्ह्यातील खालापूर व बिरवाडी, महाड येथे १२ वैद्यकीय साहित्य संच देण्यात आले. 

विद्यार्थ्यांना HTML व Coding चे प्रशिक्षण देण्यात येणार

आठवी, नववी, दहावीनंतर विद्यार्थ्यांसाठी HTML व Coding चे बेसिक प्रशिक्षण मिळाल्यास पुढील भविष्यासाठी उपयोगी ठरू शकेल. 

शहरी भागातील मुलांसोबत स्पर्धेत उतरताना आत्मविश्वास तयार होईल. यासाठी  रायगड मधील सावरोली, उंबरे, ता.खालापूर, बिरवाडी, ता. महाड येथील ३० विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक प्रशिक्षण केंद्र उपलब्ध करून देण्यात येत आहे. Skilled Development Online Coarse

या प्रसंगी शिक्षण मंत्री दीपक केसरकर, आमदार भरत गोगावले यांच्यासह कोपरन लॅबोरेटरीजचे सुरेंद्र सोमाणी, वरूण सोमाणी, अजित जैन, राकेश दोशी, संजय दोशी, सुनील सोधानी, ललित राजपुरोहीत, श्रीमती व्ही.पी.एस. नायर,  सँडोजचे सुधीर भांडारे, समीर कोरे, पंकज गुप्ते, अजित जांभळे, लुसी दास यांच्यासह एमेरिकर्सचे अनिर्बण मित्रा, अशोक राणा, गुरुप्रसाद जानवेकर उपस्थित होते.

या साहित्य वितरण कार्यक्रमाचे संयोजन मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाचे प्रमुख तथा राज्य समन्वयक डॉ. अमोल शिंदे, समन्वयक मनोज घोडे-पाटील, सतिश जाधव आदींनी केले.

Post a Comment

0 Comments