रेल्वेमध्ये 1113 पदांसाठी प्रशिक्षणार्थी भरती 2024

Indian Relways Apprentice Recruitment - 2024'

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे रायपूर येथे आयटीआय उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांकडून अप्रेंटिसशिप साठी अर्ज मागविण्यात आले आहेत. 

याबाबतची अधिसूचना दक्षिण पूर्व मध्य रेल्वे कार्यालयाच्या वतीने दिनांक 2 एप्रिल 2024 रोजी प्रकट करण्यात आली आहे.

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे अप्रेंटिसशिप भरती 2024

वर्ष 2023 - 2024 साठी दक्षिण पूर्व मध्य रेल्वे रायपुर मंडळ तथा वॅगन रिपेअर शॉप रायपूर येथे अप्रेंटिस ॲक्ट 1961 व अप्रेंटिस नियम 1962 अंतर्गत एक वर्षाकरिता अप्रेंटिस करण्यासाठी पात्र व इच्छुक आयटीआय उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. 'Indian Relways Apprentice Recruitment - 2024'

अप्रेंटिसशिप करिता निवड झालेल्या उमेदवारांना रेल्वे बोर्डाच्या वतीने विद्यावेतन दिले जाणार आहे. 

आयटीआय मधून विविध ट्रेड उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना अप्रेंटिससाठी अर्ज करता येणार आहे. 

शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज करण्याची पद्धत व शेवट दिनांक

शैक्षणिक पाञता :- उमेदवार 10 + 2 शिक्षण पद्धतीनुसार दहावी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण झालेला असावा. तसेच परीक्षेमध्ये किमान 50 टक्के गुण असणे आवश्यक आहे.

अप्रेंटिस करण्यासाठी इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांना  कोणत्याही मान्यता प्राप्त संस्थेमधून संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

अर्ज करण्याचा कालावधी व पद्धत :- ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याचा शेवट दिनांक 1/5/2024 असून दिनांक 2/4/2024 ते दिनांक 1/5/2024 रोजी रात्री 12.00 वाजेपर्यंत फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

वयोमर्यादा :- वयोमर्यादा किमान 15 वर्षे व कमाल 24 वर्षे आहे. 

एससी, एसटी उमेदवारांना वयोमर्यादेत पाच वर्षाची शिथिलता असून ओबीसी उमेदवारांना तीन वर्षे व माजी सैनिक उमेदवारांना दहा वर्षाची वयोमर्यादेमध्ये शिथिलता आहे. "Indian Relways Apprentice Recruitment"

जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

Post a Comment

0 Comments